तैमूर अली खानचा बाल्कनीत बसलेला फोटो व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 10:37 IST2017-07-06T05:07:34+5:302017-07-06T10:37:34+5:30

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर हा जन्माला येण्याच्या आधीपासूनच लोकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. तैमूरच्या ...

Timur Ali Khan photo viral sitting in the balcony! | तैमूर अली खानचा बाल्कनीत बसलेला फोटो व्हायरल!!

तैमूर अली खानचा बाल्कनीत बसलेला फोटो व्हायरल!!

िना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर हा जन्माला येण्याच्या आधीपासूनच लोकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. तैमूरच्या जन्मानंतर तर त्याची एक झलक टिपण्यासाठी अनेक कॅमेरा नेहमीच त्याच्या अवतीभवती दिसतात. तैमूर अली खान कोणत्याही रॉकस्टरपेक्षा कमी नाही आहे असे म्हणले तर वावग ठरणार नाही. इतक्या लहान वयातच तैमूरचे अनेक फॅन्स आहेत. ऐवढेच नाही तर तैमूरच्या नावचे सोशल मीडियावर पेज देखील आहे. सध्या तैमूरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात तैमूर बाल्कनीतल्या झोपळ्यावर बसलेला आहे. तैमूरच्या बाकीच्या फोटोंप्रमाणे हा फोटोदेखील चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. एकीकडे लोक तैमूर कपूर आहे की खान याबाबत चर्चा करण्यात रंगले आहेत तर दुसरीकडे तो मात्र आपल्या निरागस हास्याने सगळ्यांचे लक्ष वेधतो आहे.




also read करिना कपूरच्या लाडक्या तैमूरने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस!

करिनाने नुकताच एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ''मी तैमूरच्या जन्मापासून आतापर्यंत त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करतेय. तो माझे आणि सैफचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मला नेहमीच वाटते तैमूर माझ्या वडिलांसारखा जास्त दिसतो. कारण मी माझ्या वडिलांसारखी दिसते. माझे आणि सैफचे नेहमीच याविषयावर मतभेद होतात की तैमूर नेमका कोणासारखा दिसतो. मी म्हणते तो कपूर खानदानसारखा दिसतो तर सैफचे म्हणणे असते तो पतौडी खानदानवर गेला आहे.'' तैमूरचे डोळे मात्र त्याचे आजोबा रणधीर कपूर आणि मावशी करिश्मा कपूरसारखे आहेत ऐवढे मात्र नक्की. तैमूरच्या जन्मानंतर करिनाने ब्रेक घेतला होता मात्र ती पुन्हा आता कामावर परतणार आहे. ‘वीरे दी वेडिंग’चे शूटींग करणार आहे. लवकरच तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा होऊ शकते. 

Web Title: Timur Ali Khan photo viral sitting in the balcony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.