रणवीरने केली ‘सुल्तान’ च्या शोवेळी स्टेजवर धम्माल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 09:47 IST2016-07-12T04:17:42+5:302016-07-12T09:47:42+5:30

 सुपरस्टार सलमान खानचा ‘सुल्तान’ चित्रपट ‘ईद’ ला रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. नुकतेच पॅरिसच्या एका ...

At the time of the show 'Sultan', Ranveer performed at the stage! | रणवीरने केली ‘सुल्तान’ च्या शोवेळी स्टेजवर धम्माल!

रणवीरने केली ‘सुल्तान’ च्या शोवेळी स्टेजवर धम्माल!

 
ुपरस्टार सलमान खानचा ‘सुल्तान’ चित्रपट ‘ईद’ ला रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. नुकतेच पॅरिसच्या एका थिएटरमध्ये चक्क रणवीर सिंग आला. आणि ‘बेबी को बेस पसंद हैं’ या गाण्यावर चक्क स्टेजवर जाऊन डान्स केला.

रणवीर सिंग हा असा कलाकार आहे की, ज्याला सेलिब्रिटी असण्याबद्दल काहीही गर्व नाही. त्यामुळे तो त्याचे चाहते आणि बी टाऊनच्या इतर कलाकारांसोबत खुपच कुल राहतो. हे गाणे लागताच त्याने स्टेजवर चढताच त्याचे सर्व चाहतेही चढले.

आणि मग जी धम्माल उडाली त्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे. ‘सुल्तान’ चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यातील ‘बेबी को बेस पसंद हैं’ या गाण्याला सर्वांचीच पसंती मिळत आहे. 

baby ko bass pasand hai song

 

Web Title: At the time of the show 'Sultan', Ranveer performed at the stage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.