नसिरुद्दीन शाहच्या वक्त व्याने टिंकल खन्ना भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 20:51 IST2016-07-24T08:41:36+5:302016-07-24T20:51:05+5:30
नसिरुद्दीन शाह हे एक सुप्रिसद्ध अभिनेते आहेत. प्रत्येक प्रकरणावर ते विचारपूर्वक टिपणी करतात. परंतू, राजेश खन्ना विषयी बोलताना त्यांनी ...

नसिरुद्दीन शाहच्या वक्त व्याने टिंकल खन्ना भडकली
नसिरुद्दीन शाह हे एक सुप्रिसद्ध अभिनेते आहेत. प्रत्येक प्रकरणावर ते विचारपूर्वक टिपणी करतात. परंतू, राजेश खन्ना विषयी बोलताना त्यांनी खन्ना हे एक सुमार अभिनेता होते असे वक्तव्य केले. त्यामुळे टिंकल खन्ना ही शाह यांच्या वक्त व्यावर चांगलीच भडकली आहे. टिंकल ही सुद्धा विचारपूर्वक बोलणारी आहे. परंतु, आपल्या वडिलांविषयी वक्तव्य केल्याने ती शांत कशी बसणार? त्याचे झाले असे की, नसिरुद्दीन शाह यांनी मुलाखतीत राजेश खन्ना विषयी अधिक बोलण्याच्या ओघात गरीब अभिनेत्यासोबतच, अलीकडे दर्जेदार चित्रपट येत असून सत्तरच्या दशकात यास खन्ना जबाबदार असल्याचे नसिरुद्दीन म्हणाले. तेव्हापासूनच दर्जेदार चित्रपटात तयार होऊ लागली होती. त्यावेळी राजेश खन्ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले होते. ते यामध्ये यशस्वी झाले. परतु, माझ्यासाठी ते मर्यादीत कलाकार होते.
त्यामुळेच त्यांना मी सुमार अभिनेता म्हणतो असेही नसिरुद्दीन म्हणाले. मागील ५० वर्षात चित्रपटात काहीच बदलले नाही. सत्तरच्या दशकापासूनच स्किप्ट, अॅक्टींग, संगीत व गाणी बिघडायला लागली आहेत. तेव्हापासून रंगीत चित्रपट तयार व्हायला लागली होती. राजेश खन्नाला त्यावेळी देव मानले जात होते. त्यांनी काहीतरी करण्याची गरज होती. नसिरुद्दीनच्या अशाप्रकारच्या वक्त व्याने व्टिंकलला राग येणे साहजिक आहे. तिने ट्विटरद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर तिने सर आपण जिवंत माणसांची इज्जत करीत नाही. परंतु, कमीत कमी मयत माणसाची तरी इज्जत करु शकता, असे म्हटले आहे. टिंकल व नसिरुद्दीन शहा यांनी सोबत कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. तिची आई फै नी या चित्रपटात नसिरुद्दीन सोबत दिसली होती. टिंकलचा पती अक्षय कुमारने सुद्धा मोहरा सह काही चित्रपटात नसिरुद्दीन शहासोबत काम केले आहे. राजेश खन्ना यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार मानले जाते. २०१२ मध्ये त्यांचे कर्करोगारने निधन झाले. टिंकलच्या या ट्विटला नसिरुद्दीन कसे उत्तर देतात याची प्रतीक्षा आहे. टिंकलला करण जौहरने सुद्धा याप्रकरणी सपोर्ट केला आहे.