टायगर श्रॉफ या 'हिरो'सह करणार नाही काम ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 17:37 IST2017-07-07T11:56:13+5:302017-07-07T17:37:40+5:30
रुपेरी पडद्यावर अभिनेता असलेल्या बाप-लेकानी एकत्र काम केल्याची अनेक उदाहरणं आहे. कधी काळी चित्रपटसृष्टी गाजवलेले दिग्गज कलाकार आपल्या मुलांसह ...
.jpg)
टायगर श्रॉफ या 'हिरो'सह करणार नाही काम ?
र पेरी पडद्यावर अभिनेता असलेल्या बाप-लेकानी एकत्र काम केल्याची अनेक उदाहरणं आहे. कधी काळी चित्रपटसृष्टी गाजवलेले दिग्गज कलाकार आपल्या मुलांसह रुपेरी पडद्यावर धम्माल करताना सा-यांनी पाहिलं आहे. यांत सगळ्यात पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे धर्मेंद्र आणि त्यांच्या मुलांचं. धर्मेंद्र यांनी सनी आणि बॉबीसह स्क्रीन शेअर करत मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला. धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा लेक अभिषेक बच्चन यांनी बंटी और बबली या सिनेमातून रसिकांवर मोहिनी घातली. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमात सुनील दत्त आणि संजय दत्त, फिरोज खान-फरदीन खान या रियल बाप-लेकाची जोडीही रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली. याच हिट जोड्याप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चर्चित बाप-लेकाची जोडी म्हणजे जॅकी श्रॉफ आणि त्यांचा लेक टायगर श्रॉफ. हिरो सिनेमातून चित्रपटसृष्टीत एंट्री मारलेल्या जॅकीदादा आणि भिडू नावाने प्रसिद्ध असलेल्या जॅकी श्रॉफ यांच्या अभिनयातील जादू आजही कायम आहे. रसिक त्यांच्या अभिनयावर आजही फिदा आहेत. दुसरीकडे जॅकीदादाचा लेक टायगरने हिरोपंती सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. आपला अभिनय आणि डान्स कौशल्याने तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. लवकरच टायगरचा 'मुन्ना मायकल' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. जॅकी श्रॉफ आणि टायगर या दोघांकडे सिनेमा असले तरी आजवर दोघं आजवर एकत्र झळकलेले नाहीत. मात्र जॅकी श्रॉफ आणि त्यांच्या लेकानं एकत्र काम करावं अशी त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे. मात्र याबाबत टायगरचं काहीसं वेगळं मत आहे. आपल्या वडिलांसह स्क्रीन शेअर करणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. याचं कारणही त्याच्याकडे आहे. टायगरच्या मते जॅकी श्रॉफ यांचं व्यक्तीमत्त्व हे रुबाबदार आहे.त्यांच्यापुढे आपण काहीही नसल्याचे टायगर प्रांजळपणे सांगतो. आमची जोडी स्क्रीनवर चांगली वाटते असं मीसुद्धा ऐकलं आहे असंही टायगरने म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात बघू, दोघे एकत्र काम करु शकतो असे संकेतही त्याने दिले आहे. मात्र सध्या तरी वडिलांसह स्क्रीन शेअर करणार नसल्याचे टायगरने सांगितले आहे.
![]()