रस्त्यावर स्केटिंग करताना दिसला टायगर श्रॉफ, 'गणपत'चं करतोय प्रमोशन, नेटकरी म्हणाले - बॉलिवूडचा खरा हिरो...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 08:50 AM2023-10-14T08:50:31+5:302023-10-14T08:51:01+5:30

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तो रस्त्यावर स्केटिंग करताना दिसतो आहे.

Tiger Shroff was seen skating on the street, promoting 'Ganpat', Netkari said - the real hero of Bollywood... | रस्त्यावर स्केटिंग करताना दिसला टायगर श्रॉफ, 'गणपत'चं करतोय प्रमोशन, नेटकरी म्हणाले - बॉलिवूडचा खरा हिरो...

रस्त्यावर स्केटिंग करताना दिसला टायगर श्रॉफ, 'गणपत'चं करतोय प्रमोशन, नेटकरी म्हणाले - बॉलिवूडचा खरा हिरो...

पूजा एण्टरटेन्मेंट्सची निर्मिती असलेला गणपत (Ganpat Movie) चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. टायगर श्रॉफ(Tiger Shroff)ला बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हटले जाते. तो अनेकदा त्याच्या अॅक्शन आणि दमदार स्टंटमुळे चर्चेत असतो. अलीकडेच टायगरने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रस्त्यावर स्केटिंग करताना दिसत आहे. टायगरच्या या व्हिडिओमध्ये तो त्याच्या आगामी चित्रपट गणपतच्या गाण्यावर स्केटिंग करताना दिसत आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेता कार पकडत स्केटिंग करत होता. नंतर तो रस्त्याच्यामध्ये स्केटिंग करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले,  कोणी विचारले तर मला सांगा... आम्ही आलो आहोत... २० ऑक्टोबर, आम्ही आमच्या मार्गावर आहोत. #गणपत.

सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर एका युजरने म्हटले की,  OMG, प्रत्यक्षात कोणताही अभिनेता हे करू शकत नाही. केवळ टायगर श्रॉफच हे करू शकतो कारण त्याच्या कामाप्रती समर्पण आहे. दुसर्‍याने लिहिले, इतर कलाकार जे काम रीलमध्ये करतात, ते #Tiger_BhaiReal मध्ये करतात. आणखी एका युजरने म्हटले की, बॉलिवूडचा खरा हिरो.

दसऱ्याला गणपत येणार भेटीला
गणपत या महिन्यात २० ऑक्टोबर रोजी हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे तर पूजा एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. टायगरशिवाय या चित्रपटात क्रिती सनॉन आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. 'गणपत'मध्ये क्रिती पहिल्यांदाच अॅक्शन करताना दिसणार आहे.
 

Web Title: Tiger Shroff was seen skating on the street, promoting 'Ganpat', Netkari said - the real hero of Bollywood...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.