पहिल्यांदाच कथित गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबतच्या नात्याविषयी बोलला टायगर श्रॉफ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 18:02 IST2017-07-21T12:27:00+5:302017-07-21T18:02:09+5:30

आज अभिनेता टायगर श्रॉफ याचा बहुप्रतीक्षित ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटात टायगर जबरदस्त डान्सरच्या भूमिकेत बघावयास ...

Tiger Shroff talks about the relationship with Patani for the first time. | पहिल्यांदाच कथित गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबतच्या नात्याविषयी बोलला टायगर श्रॉफ!!

पहिल्यांदाच कथित गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबतच्या नात्याविषयी बोलला टायगर श्रॉफ!!

अभिनेता टायगर श्रॉफ याचा बहुप्रतीक्षित ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटात टायगर जबरदस्त डान्सरच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. जर तुम्ही हा चित्रपट बघण्याचा प्लॅन करीत असाल तर अगोदर या चित्रपटाविषयीचा रिव्ह्यू नक्की वाचा. त्याकरिताMunna Michael Movie review' येथे क्लिक करा. असो, आज आम्ही तुम्हाला टायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी यांच्यातील नात्याविषयीची एक ब्रेकिंग न्यूज सांगणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांविषयी प्रचंड चर्चा रंगत आहे; मात्र त्यांनी त्यांच्यातील नात्याविषयीचा खुलासा केला नसल्याने प्रत्येकालाच याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 

टायगरने दिशासोबतच्या नात्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असून, ते खूपच परिपक्व असल्याचे दिसून येते. जेव्हा टायगरला ‘दिशासोबतच्या तुझ्या नात्यावर नेहमीच चर्चा रंगत असते, याचा तुला त्रास होतो काय?’ असे विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, ‘मला याचा त्रास होत नाही. उलट मी या चर्चा एन्जॉय करतो.’ टायगरच्या या वक्तव्यात बरेच अर्थ सामावलेले असून, दिशा त्याच्या हृदयाजवळ असावी, असे म्हणता येईल. दरम्यान, टायगर ‘मुन्ना मायकल’नंतर ‘बागी-२’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी फिट बसण्यासाठी सध्या टायगर प्रचंड घाम गाळत आहे. 

या चित्रपटात त्याच्या अपोझिट अभिनेत्री श्रद्धा कपूर नसेल, तर त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. वास्तविक ‘बागी’च्या सीक्वलचा विचार करताना निर्मात्यांना एका नव्या चेहºयाचा शोध होता. त्यानुसार त्यांनी दिशाचे नाव निश्चित केले. वास्तविक दिशा आणि टायगरमधील केमिस्ट्री ‘बेफिकरा’ या गाण्यात आपण बघितलीच आहे. त्यामुळे या चित्रपटातदेखील हे दोघे रंग भरतील यात शंका नाही. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित विचारलेल्या अनेक प्रश्नांवर टायगरने उत्तरे दिली. दिशा आणि त्याच्यातील केमिस्ट्रीवरदेखील त्याने बिंधास्तपणे भाष्य केले. 

दिशासोबतच्या केमिस्ट्रीविषयी बोलताना टायगरने म्हटले की, ‘मी तिच्यासोबत काम करताना खूपच कम्फर्टेबल असतो. आमच्यातील केमिस्ट्री खूपच चांगली आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करणे खूपच मजेशीर असते. जेव्हा टायगरला तिच्यासोबतच्या नात्याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, ‘दिशासोबतच्या माझ्या नात्याविषयी जेव्हा चर्चा रंगतात तेव्हा मला काहीच वाटत नाही. वास्तविक अशा चर्चा प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे सगळ्यांनाच यामधून जावे लागते. लोक काय म्हणतील ते म्हणू द्या, मात्र त्याचा आमच्यावर काही परिणाम होत नसतो.’

आता टायगरचे हे वक्तव्य परिपक्व की भावना व्यक्त करणारे, याचा अर्थ त्याच्या चाहत्यांना कदाचित उमजला असेल. असो, ‘बागी-२’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करीत असून, लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. या चित्रपटासाठी टायगर पूर्णपणे तयार असून, दिशादेखील टायगरसोबत काम करण्यास उत्सुक आहे. 

Web Title: Tiger Shroff talks about the relationship with Patani for the first time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.