टायगर श्रॉफ अन् दिशा पाटनी पुन्हा एकत्र? 'खिलाडी' कुमारनेच शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:11 PM2023-12-11T16:11:06+5:302023-12-11T16:11:54+5:30

ब्रेकअपनंतर टायगर आणि दिशा पुन्हा एकत्र दिसले आहेत.

Tiger Shroff and Disha Patni seen together again Akshay Kumar shared video of them | टायगर श्रॉफ अन् दिशा पाटनी पुन्हा एकत्र? 'खिलाडी' कुमारनेच शेअर केला Video

टायगर श्रॉफ अन् दिशा पाटनी पुन्हा एकत्र? 'खिलाडी' कुमारनेच शेअर केला Video

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतली जोडी म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पाटनी (Disha Patni). दोघांचा ब्रेकअप झाला तेव्हा चाहत्यांनाही धक्का बसला होता. एकदम फिट अँड फाईन असलेले हे दोन्ही कलाकार एकमेकांना शोभून दिसायचे. अनेक ठिकाणी दोघंही हातात हात घालून फिरायचे. आता ब्रेकअपनंतर टायगर आणि दिशा पुन्हा सोबत दिसले आहेत. त्यांच्या या भेटीमागे अक्षय कुमारचा हात आहे. अक्षय कुमारने (Akshay Kumar) नुकतंच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत दोघंही सोबत दिसत आहेत. 

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आगामी 'बडे मिया छोटे मिया' आणि 'सिंघम 3' सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकतंच अक्षयने इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि काही खेळाडू व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेत आहेत. अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले,'प्रो कबड्डी लीगच्या सुरु होण्यापूर्वी बंगाल वॉरियर्ससोबत एक फ्रेंडली गेम खेळण्याची संधी मिळाली. तुम्ही आतापर्यंत केलेलं प्रदर्शन पाहून आनंद होतो.तुमचा अभिमान वाटतोय.  हा खेळाचा आनंद द्विगुणित झाला जेव्हा टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीही जॉईन झाले. आम्ही जिंकलो की नाही ओळखा!

अक्षय कुमारमुळे टायगर आणि दिशा पुन्हा एकत्र दिसले. पण त्यांचं पॅचअप झालं नसून केवळ मित्रांच्या नात्याने ते एकत्र आलेत. तसंच दोघांचं अक्षय कुमारसोबत जवळचं नातं आहे. टायगर नेहमीच अक्षय कुमारच्या घरी व्हॉलिबॉल खेळण्यासाठी जातो. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसंच दिशाही अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू जंगल' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय दिशा साऊथ सुपरस्टार सूर्यासोबत 'सूर्या 42' मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योद्धा' मध्येही तिची भूमिका आहे.
 

Web Title: Tiger Shroff and Disha Patni seen together again Akshay Kumar shared video of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.