टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या 'बागी2' चे शूटिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 13:53 IST2017-08-08T07:01:27+5:302017-08-08T13:53:12+5:30

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. लवकरच दोघे 'बागी2' चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाची ...

Tiger Shroff and direction Patani's 'Baji 2' shoot starts | टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या 'बागी2' चे शूटिंग सुरू

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या 'बागी2' चे शूटिंग सुरू

यगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. लवकरच दोघे 'बागी2' चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. दिशा पटानीने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतचा फोटो शेअर केला आहे.या फोटोत टायगर श्रॉफ आणि टीमचे इतर दिसतायेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटात दिशा पटानी आणि श्रद्धा कपूर यांच्या नावाची चर्चा होती. शेवटी मेकर्सनी दिशाची निवड केली. या फोटोला दिशाने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. ''आम्ही सगळे एका नव्या प्रवासासाठी तयार आहोत''.  



याचित्रपटाची निर्मिती साजिद नाडियावाला करतो आहे. बागी2 चे पोस्टर प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले होते. चित्रपट 2018ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या मेकर्सचा दावा आहे की या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार  या चित्रपटासाठी टायगर श्रॉफ विशेष ट्रेनिंग घेतो आहे. टायगर आणि दिशाचे फॅन्स त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्यास उत्सुक आहेत. दोघांची ऑनस्किन केमिस्ट्री बघण्यास प्रेक्षक आतुर असतील यात शंका नाही. दोघे ही एकमेकांना टेड करत असल्याची चर्चा आहे. अनेक वेळा दोघांना डिनरला आणि लाँग ड्राईव्हला एकत्र जाताना बघितले आहे. मात्र या दोघांनी आपले नाते कधीच स्वीकारले नाही.    

ALSO READ : जॅकी श्रॉफला मुलगा 'टायगर' वाटतोय घोड्यासारखा; पण जॅकीदाला असे का वाटत असावे?

काही दिवसांपूर्वीच टायगरचा मुन्ना मायकल रिलीज झाला आहे. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला नाही.  

Web Title: Tiger Shroff and direction Patani's 'Baji 2' shoot starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.