'एबीसीडी-3' मध्ये टायगर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 12:03 IST2016-05-30T06:33:20+5:302016-05-30T12:03:20+5:30
सुपरहिट एबीसीडी सिनेमाचा सिक्वेल बनणारा रेमो डिसुजा आता हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. रेमो सध्या एबीसीडी-3 सिनेमाच्या प्रॉडक्शन वर्कमध्ये बिझी ...

'एबीसीडी-3' मध्ये टायगर !
स परहिट एबीसीडी सिनेमाचा सिक्वेल बनणारा रेमो डिसुजा आता हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. रेमो सध्या एबीसीडी-3 सिनेमाच्या प्रॉडक्शन वर्कमध्ये बिझी आहे. इतकंच नाही तर या सिनेमासाठी वरुण धवनचा पत्ता कट झाला असून त्याच्या जागी वर्णी लागली आहे ती डॅशिंग आणि रायजिंग स्टार टायगर श्रॉफची. टायगच्या डान्सवर तर सारेच फिदा आहेत. आता तर त्यांच्या या डान्सवर रेमोही फिदा झालाय. सध्या टायगर रेमोच्या फ्लाइंग जट या सिनेमात काम करतोय. टायगरचा डान्स आणि अभिनय रेमोला चांगलंच भावतंय. त्यामुळंच एबीसीडी-3 मध्ये टायगरची वर्णी लागलीय. आता टायगर रेमोचा विश्वास किती सार्थ ठरवतो याकडं रसिकांच्या नजरा लागल्यात.