सकाळी ६ च्या शोवरुन सलमानने स्वत:चीच उडवली खिल्ली, 'टायगर 3' च्या प्रमोशनमध्ये धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 09:43 AM2023-11-10T09:43:28+5:302023-11-10T09:44:12+5:30

६ वाजताचा शो आहे ते ठीक आहे मी पकडेन पण ना ७ नंतरची फ्लाईट...

Tiger 3 salman khan attend promotional event of the film makes joke on morning 6 show | सकाळी ६ च्या शोवरुन सलमानने स्वत:चीच उडवली खिल्ली, 'टायगर 3' च्या प्रमोशनमध्ये धमाल

सकाळी ६ च्या शोवरुन सलमानने स्वत:चीच उडवली खिल्ली, 'टायगर 3' च्या प्रमोशनमध्ये धमाल

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा 'टायगर 3' (Tiger 3) दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होत आहे. चाहत्यांचा उत्साह तर गगनात मावेनासा झालाय. सलमानही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच 'टायगर 3' च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमानने चाहत्यांशी संवाद साधला. तसंच त्याने सकाळी ६ च्या पहिल्या शोचा उल्लेख करत स्वत:चीच खिल्ली उडवली. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत कतरिना कैफ म्हणते की 'टायगर ३3 मधून तिने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. दरम्यान जेव्हा होस्ट सांगतो की सिनेमाचा पहिला शो सकाळी ६ वाजता आहे तर यावर सलमान जोरजोरात हसायला लागलो आणि म्हणतो, '६ वाजताचा शो आहे ते ठीक आहे मी पकडेन पण ना ७ नंतरची फ्लाईट पकडली जाते ना ही फिल्म.' सलमानच्या या प्रतिक्रियेनंतर सगळे हसायला लागतात. 

यशराज फिल्म्सच्या टायगर फ्रँचायझीची ही तिसरी फिल्म आहे. तसंच यामध्ये वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सची झलक आहे. यामध्ये शाहरुख खान 'पठाण' बनून आणि हृतिक रोशन 'वॉर' चा कबीर बनून टायगरची मदत करताना दिसणार आहेत. मनिष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' चा रन टाईमही मेकर्सने वाढवला आहे. 

Web Title: Tiger 3 salman khan attend promotional event of the film makes joke on morning 6 show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.