थँक्स शाहीद!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:14 IST2016-03-10T14:53:25+5:302016-03-10T08:14:50+5:30
चुलबुली आलिया भट्ट सध्या शाहीद कपूरचे आभार मानताना थकत नाहीयं. निमित्त??? अहो, निमित्त काय असणार? निमित्त आहे ‘उडता पंजाब’. ...

थँक्स शाहीद!!!
ुलबुली आलिया भट्ट सध्या शाहीद कपूरचे आभार मानताना थकत नाहीयं. निमित्त??? अहो, निमित्त काय असणार? निमित्त आहे ‘उडता पंजाब’. होय, शाहीदनेच या चित्रपटासाठी आलियाच्या नावाची शिफारस केली होती.खुद्द आलियाने हे सांगितले.‘उडता पंजाब’ साठी माझे नाव साधे विचारातही नव्हते. मी या चित्रपटात काम करू शकेल, असा विचाराही कुणाच्या मनात आला नव्हता. कारण ‘उडता पंजाब’ हा मी केलेल्या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. पण शाहीदने मला या चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचायला दिले. अन् मी अक्षरश: या चित्रपटाच्या प्रेमात पडले. यात भूमिका साकारायला मी उत्सूक होते. शाहीदनेच यातील भूमिकेसाठी माझ्या नावाची शिफारस केली. मी त्याची अतिशय आभारी आहे. हा चित्रपट मला पूर्णपणे वेगळ्या झोनमध्ये घेऊन गेला. माझ्यातील अभिनयाचे स्किल सिद्ध करण्याची संधी या चित्रपटाने मला दिली.‘उडता पंजाब’ या चित्रपटात करिना कपूर आणि दलजीत दोसांज हेही मुख्य भूमिकेत आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित हा चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.