Thugs of Hindostan : आमिर खान तोडणार जगासोबतचा संबंध? का ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 12:45 PM2017-01-20T12:45:33+5:302017-01-20T12:45:33+5:30

‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर प्रचंड गल्ला कमावला. त्यानंतर ‘दंगल’ काही राज्यात ‘टॅक्स फ्री’ देखील झाला. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही चित्रपटाला अक्षरश: ...

Thugs of Hindostan: Aamir Khan breaks the relationship of the world? Learn why ... | Thugs of Hindostan : आमिर खान तोडणार जगासोबतचा संबंध? का ते जाणून घ्या...

Thugs of Hindostan : आमिर खान तोडणार जगासोबतचा संबंध? का ते जाणून घ्या...

googlenewsNext
ंगल’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर प्रचंड गल्ला कमावला. त्यानंतर ‘दंगल’ काही राज्यात ‘टॅक्स फ्री’ देखील झाला. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतले. मात्र, या चित्रपटानंतर असे काय झाले की, अभिनेता आमिर खानला जगासोबतचा असलेला संबंध तोडून टाकावासा वाटला. होय, तुम्ही वाचताय ते अगदी खरंय. मात्र, जगासोबतचे नाते तोडण्याचे कारण काहीसे वेगळे आहे.  तो त्याचा आगामी चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ मध्ये बिझी झाला आहे. त्याच्या काम करण्याचे एक वैशिष्ट्य असे आहे की, त्याने एखादा प्रोजेक्ट करायला सुरूवात केली की तो त्या प्रोजेक्टमध्ये बिझी होऊन जातो. त्याला त्याच्या कामात कुणी डिस्टर्ब केलेलंही आवडत नाही. त्यामुळे तो आता महिनाभर जगापासून दूर राहणार असल्याचे कळतेय. 



‘दंगल’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी आमिर खान यूएसला गेला होता. तेव्हा त्याला भेटण्यासाठी अनेक व्हिजिटर्स तिथे आले. त्यामुळे त्याच्या शूटिंगमध्ये बराच खंड पडला. त्याच्या स्वभावानुसार त्याला परदेशी पर्यटकांनी येऊन त्याला डिस्टर्ब केलेलं बिल्कुल आवडलं नाही. आता तो ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटासाठी कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत आहे. या ट्रेनिंगमध्ये स्पोर्टस आधारित अ‍ॅक्टिव्हिटी ट्रेकिंग, स्विमिंग, टेनिस, जिम हे सर्वप्रकार करून घेतले जात आहेत. दरदिवशी त्याला ६ तासांची ट्रेनिंग दिली जाते आणि रोज ९ तासांची झोप अनिवार्य ठरवली आहे. आता ही ट्रेनिंग कुठे सुरू आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणजे हिंदी महासागराच्या दक्षिण पश्चिम परिसरात ही ट्रेनिंग देण्यात येत आहे. 

‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ हा चित्रपट खुप दिवसांपासून चर्चेत आहे. आमिर खानसोबत अमिताभ बच्चन हे दिसतील. तसेच क्रिती सॅनन ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. क्रितीबद्दलच्या बातम्या अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. मात्र, आमिर खान, अमिताभ बच्चन हे स्टारकास्ट सध्या तरी निश्चित करण्यात आले आहेत. अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोन दिग्गज या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

Also Read :
* ​आमिरला पडलाय प्रश्न : ठग्स आॅफ हिंदोस्थामधील लूक असणार तरी कसा

Web Title: Thugs of Hindostan: Aamir Khan breaks the relationship of the world? Learn why ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.