मृत्यूआधी पूनम पांडेची ही होती शेवटची इंस्टा पोस्ट? फोटो शेअर करुन म्हणाली - "अडकले..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 12:25 PM2024-02-02T12:25:54+5:302024-02-02T12:26:19+5:30

मॉडेल पूनम पांडे(Poonam Pandey)च्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या इंस्टाग्रामवर तिच्या निधनाची पोस्ट आली, ज्याने सर्वांनाच धक्का बसला.

This was Poonam Pandey's last Insta post before she died? Sharing the photo, she said - "Stuck..." | मृत्यूआधी पूनम पांडेची ही होती शेवटची इंस्टा पोस्ट? फोटो शेअर करुन म्हणाली - "अडकले..."

मृत्यूआधी पूनम पांडेची ही होती शेवटची इंस्टा पोस्ट? फोटो शेअर करुन म्हणाली - "अडकले..."

मॉडेल पूनम पांडे(Poonam Pandey)च्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या इंस्टाग्रामवर तिच्या निधनाची पोस्ट आली, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, आता अभिनेत्रीची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पांढऱ्या ब्रॅलेटमध्ये दिसत आहे.

पूनम पांडेने तिच्या मृत्यूच्या अवघ्या ३ दिवस आधी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ती पांढऱ्या ब्रॅलेट आणि पँटमध्ये दिसली होती. या पोस्टमध्ये पूनम एका जहाजात दिसत आहे, ज्यामुळे लोक तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अंदाज लावत होते. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम पोस्टवर ती तिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत जहाजावर दिसत आहे. पूनम नेहमीप्रमाणे पांढऱ्या ब्रालेटमध्ये तिच्या चाहत्यांना प्रभावित करताना दिसली. मात्र, आता तिच्या मृत्यूची बातमी समोर येताच पूनमच्या चाहत्यांकडून तिच्या शेवटच्या पोस्टवर शोक व्यक्त केला जात आहे. 


पूनम आता या जगात नाही यावर चाहत्यांना विश्वास बसणे कठीण आहे. याआधीही पूनमने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती त्याच ब्रालेट परिधान करताना दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये पूनमने लिहिले आहे की, ती तिच्या आवडीचे कपडे आणि तिच्या वॉर्डरोबमधील गोंधळात अडकली आहे. हा संघर्ष खरा आहे.

पूनम पांडेच्या मॅनेजरने हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की १ फेब्रुवारीच्या रात्री सर्वाइकल कॅन्सरमुळे तिचे निधन झाले. पूनम पांडेच्या टीमने सांगितले की, पूनमने तिच्या मूळ गावी कानपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.  पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टेटमेंट शेअर करण्यात आले, ज्यामध्ये लिहिले की, 'आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, सर्वाइकल कर्करोगाने आम्ही आमची प्रिय पूनम गमावली आहे. 

Web Title: This was Poonam Pandey's last Insta post before she died? Sharing the photo, she said - "Stuck..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.