माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता हा सुपरस्टार, हॉकी स्टिकने मारण्यासाठी धावली होती अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:57 IST2025-05-16T17:56:34+5:302025-05-16T17:57:00+5:30
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)चा एक किस्सा आजही चर्चेत येतो. तो म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार तिच्या हातावर थुंकला होता. अभिनेत्री खूप रागावली होती आणि तिने त्याला मारण्यासाठी हॉकी स्टिकही उचलली.

माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता हा सुपरस्टार, हॉकी स्टिकने मारण्यासाठी धावली होती अभिनेत्री
अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. तिने चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिच्या सौंदर्याची चर्चा केवळ देशातच नाही तर परदेशातही व्हायची. अभिनेत्रीच्या सौंदर्यावर बॉलिवूड स्टार्सही घायाळ व्हायचे. तिच्याशी संबंधित अनेक किस्से लोकप्रिय आहेत. तिचा एक किस्सा आजही चर्चेत येतो. तो म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार तिच्या हातावर थुंकला होता. अभिनेत्री खूप रागावली होती आणि तिने त्याला मारण्यासाठी हॉकी स्टिकही उचलली.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आमिर खान आहे. हा किस्सा आहे १९९० साली 'दिल' चित्रपटाच्या सेटवरील. आमिरसोबत माधुरी मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिरने अभिनेत्रीसोबत मस्करी केली ज्यामुळे तिला राग आला. एकदा आमिरने स्वतः फरहान अख्तरच्या शोमध्ये खुलासा केला होता की, त्याने माधुरी दीक्षितची कशी मस्करी केली होती. तो माधुरीला खोटं बोलला होता की तो तिचा तळहात पाहून भविष्य सांगेल, पण नंतर तो तिच्या हातावर थुंकला. त्याने अनेक लोकांसोबत असे केले होते.
माधुरी हॉकी स्टिक घेऊन त्याच्या मागे धावू लागली
जेव्हा आमिर खानने माधुरी दीक्षितसोबत असे केले तेव्हा ती रागाने लाल झाली आणि सेटवर हॉकी स्टिक घेऊन त्याच्या मागे धावू लागली. २०१६ मध्ये 'आस्क मी एनीथिंग' दरम्यान माधुरीने ही घटना सर्वात खोडकर असल्याचे वर्णन केले होते. ती म्हणाली होती की, "मी आमिर खानचा 'दिल'च्या सेटवर हॉकी स्टिकने पाठलाग केला कारण त्याने माझी मस्करी केली होती. हे मी आतापर्यंत केलेले सर्वात खोडकर काम आहे."