‘या’ स्टार्सची आहेत ‘ही’ येलो बेल्ट चॅम्पियन जुळी मुले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 19:57 IST2017-08-06T14:27:51+5:302017-08-06T19:57:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या दुसºयांदा गर्भवती असून, यावेळेसदेखील ती जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. सेलिनाला विन्स्टन आणि विराज ...

'These' stars are 'yellow belt champions twins !! | ‘या’ स्टार्सची आहेत ‘ही’ येलो बेल्ट चॅम्पियन जुळी मुले!!

‘या’ स्टार्सची आहेत ‘ही’ येलो बेल्ट चॅम्पियन जुळी मुले!!

लिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या दुसºयांदा गर्भवती असून, यावेळेसदेखील ती जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. सेलिनाला विन्स्टन आणि विराज नावाची दोन जुळी मुले असून, त्यांचे फोटो ती नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करीत असते. आता तिने असाच एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये सेलिनाचे दोन्ही चिमुकले कराटे ड्रेसमध्ये बघावयास मिळत आहेत. दोघेही या ड्रेसमध्ये खूपच क्युट दिसत असून, त्यांचे हे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. शिवाय सेलिनाच्या चाहत्यांकडून त्यास मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेण्टही मिळत आहेत. 

सेलिनाने विन्स्टन आणि विराजचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘यलोबेल्ट आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. विन्स्टन आणि विराज यांना आज कराटेमध्ये येलो बेल्ट मिळाला आहे.’ यावेळी सेलिनाने तिच्या वडिलांनाही स्मरण केले. सेलिनाने लिहिले की, ‘आज माझे वडील असते तर तुम्हाला बघून ते खूप आनंदी झाले असते. पीटर आणि मी खूप उत्साहित आहे.’ काही दिवसांपूर्वीच सेलिनाचे वडील व्ही. के. जेटली यांचे निधन झाले. सेलिनाचे वडील सैन्यात होते. प्रदीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा सेलिना दुबईला होती. 



दरम्यान, सेलिना वडिलांच्या खूप क्लोज होती. त्यामुळे अजूनही ती त्यांच्या आठवणी विसरू शकली नाही, हेच यावरून दिसून येते. काही दिवसांपूर्वीच सेलिना आणि तिचा पती पीटर यांनी खुलासा केला होता की, आम्ही पुन्हा एकदा जुळ्या मुलांचे आई-वडील बनणार आहोत. सध्या सेलिना आणि तिचा परिवार या नव्या पाहुण्यांची प्रतीक्षा करीत आहेत. सेलिना नेहमी तिचे गर्भावस्थेतील फोटोज् इन्स्टावर शेअर करीत असते. 

Web Title: 'These' stars are 'yellow belt champions twins !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.