बॉलिवूडच्या या कलाकारांकडे आहे स्वतःचं खासगी जेट प्लेन,प्रवासासाठी खर्च करतात कोट्यवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 15:03 IST2018-03-09T09:32:00+5:302018-03-09T15:03:59+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आरामदायी आणि ऐशोआरामाच्या स्टाईलची कायमच चर्चा असते. मात्र या कलाकारांच्या जीवनातही धावपळ काही कमी नसते. रोजची ...

These Bollywood artists have their own private jet planes, expenses for travel, billions of rupees | बॉलिवूडच्या या कलाकारांकडे आहे स्वतःचं खासगी जेट प्लेन,प्रवासासाठी खर्च करतात कोट्यवधी रुपये

बॉलिवूडच्या या कलाकारांकडे आहे स्वतःचं खासगी जेट प्लेन,प्रवासासाठी खर्च करतात कोट्यवधी रुपये

ंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आरामदायी आणि ऐशोआरामाच्या स्टाईलची कायमच चर्चा असते. मात्र या कलाकारांच्या जीवनातही धावपळ काही कमी नसते. रोजची दगदग आणि कामाचा ताण कलाकारांवर असतो.कामासाठी कायम एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी त्यांना जावं लागतं.आपला हा प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी बहुतांशी कलाकार स्वतःच्या खासगी जेट प्लेनचा वापर करतात.बॉलिवूडच्या ब-याच कलाकारांकडे स्वतःचं जेट प्लेन असून त्यानेच ते प्रवास करतात.हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं जेट ज्या कलाकाराकडे आले त्याचे नाव म्हणजे बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगण.बॉलिवूडमध्ये सगळ्यात आधी अजयने खासगी जेट खरेदी केले.त्याच्याकडे सहा आसनी जेट असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तो याचा वापर करतो.शिवाय सिनेमाच्या प्रमोशनसाठी फिरतानाही तो हे जेट वापरतो.हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांना वेळेचं महत्त्व चांगलंच माहिती आहे.या वयातही त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट असून कोणत्याही आजच्या कलाकारापेक्षा सगळ्यात बिझी बिग बी आहेत.त्यामुळेच वेळ वाचवण्यासाठी बिग बीसुद्धा जेटचा वापर करतात. त्यांच्याकडेही स्वतःचे खासगी जेट आहे. देशातील विविध शहरात जाण्यासाठी आणि परदेशात जाण्यासाठी ते जेट वापरतात. बॉलिवूडचा दबंग सलमान खानकडेही स्वःचे जेट प्लेन आहे.कायम बिझी असणारा सलमान खासगी अन् कौटुंबिक ट्रीप, शूटिंग आणि प्रमोशनसाठी विविध शहरात फिरताना जेट प्लेन वापरतो.बॉलिवूडचा बादशाह एखाद्या बादशाहप्रमाणे म्हणजेच किंगप्रमाणे जीवन जगतो.सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी कुटुंबासह जाणं असो किंवा मग शूटिंग,बॉलिवूडचा किंग जेटचा वापर करतो.सिनेमाच्या प्रमोशनसाठीही शाहरुख याच जेटचा वापर करतो.बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही कोणत्याही ठिकाणी वेळेत पोहचणं पसंत करतो. सिनेमाचं शुटिंग असो किंवा इव्हेंट तो खासगी जेटचा वापर करतो.कुटुंबासह बाहेर फिरायला जातानाही तो हेच जेट वापरतो.याशिवाय शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा यांच्याकडेही स्वतःचं खासगी जेट प्लेन आहे.




Web Title: These Bollywood artists have their own private jet planes, expenses for travel, billions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.