सरोगसीसंबंधी कडक नियम असावे - शाहरुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:34 IST2016-01-16T01:14:54+5:302016-02-07T12:34:57+5:30

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान विविध सामाजिक विषयांवरच्या त्याच्या चौफेर मतांमुळे नेहमी चर्चेत राहतो. त्याला जे वाटते, ते प्रामाणिकपणे तो ...

There should be stringent rules for surrogacy - Shahrukh | सरोगसीसंबंधी कडक नियम असावे - शाहरुख

सरोगसीसंबंधी कडक नियम असावे - शाहरुख

लिवूडचा बादशाह शाहरुख खान विविध सामाजिक विषयांवरच्या त्याच्या चौफेर मतांमुळे नेहमी चर्चेत राहतो. त्याला जे वाटते, ते प्रामाणिकपणे तो बोलून दाखवतो.

एक जबाबदार नागरिक म्हणून तो विचार मांडतो. विविध बाबतीत चर्चेच्या विषय बनलेले सरोगसी विधेयकावरही त्याने त्याचे मत मांडले आहे. सरोगसीसंबंधी कडक नियम असावे आणि त्याचे कायद्याच्या मार्गदर्शनानुसार पालन व्हावे असे त्याला वाटते. 

तो म्हणतो, एक विधायक प्रक्रियेद्वारे सरोगसीचे नियमन व्हायला पाहिजे. अब्रामच्या जन्मा अगोदर मी या विषयावर खूप अभ्यास केला आहे. अनेक देशांमध्ये सरोगसी नियंत्रण यंत्रणा आहेत. आपल्या देशातही तशी व्यवस्था असावी.

शाहरुख आणि गौरीचा तिसरा मुलगा अब्रामचा जन्म दोन वर्षांपूर्वी मे महिन्यात सरोगसीद्वारे झाला होता. तो पुढे म्हणतो, 'आयुष्यात बाळ होणे ही सवरेत्तम गोष्ट आहे आणि काही कारणास्तव जे लोक यापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी सरोगसी हा पर्याय आहे.'

SRK


SRK

Web Title: There should be stringent rules for surrogacy - Shahrukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.