टायगरसोबत काम करण्याचा विचार नाही - वर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 16:18 IST2017-04-29T10:48:23+5:302017-04-29T16:18:23+5:30

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि टायगर श्रॉफ यांच्यामध्ये मध्यंतरी चांगलेच वादंग माजले होते. वर्मा यांनी एका मॅगझीनवरील टायगरच्या फोटोबद्दल ...

There is no idea of ​​working with Tiger - Verma | टायगरसोबत काम करण्याचा विचार नाही - वर्मा

टायगरसोबत काम करण्याचा विचार नाही - वर्मा

ग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि टायगर श्रॉफ यांच्यामध्ये मध्यंतरी चांगलेच वादंग माजले होते. वर्मा यांनी एका मॅगझीनवरील टायगरच्या फोटोबद्दल विचित्र कमेंट केली. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यासारख्या पोझमध्ये टायगर दिसतो आहे, अशी कमेंट वर्मा यांनी टिवटरवर पोस्ट केली. याबद्दल त्यांनी नंतर माफीही मागितली. मात्र, अजूनही टायगरला घेऊन चित्रपट साकारण्याची वर्मा यांची इच्छा नाही. टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ यांच्यासोबत वर्मा सध्या ‘सरकार ३’ ची शूटिंग करत आहेत. त्यामुळे त्यांना विचारण्यात आले की, ‘तुम्ही टायगरसोबत काम करू इच्छिता का? ’ तेव्हा ते म्हणाले,‘ नाही. सध्या तरी तसा काही माझा विचार नाही. जॅकी आणि मी चांगले मित्र आहोत. जे काही झालं तो भूतकाळ होता. आता त्याचा काही एक संबंध नाही. मी त्याबद्दल टायगरची माफी देखील मागितली आहे. त्याविषयी जास्त काही बोलण्याची माझी इच्छा नाही.’ 


Web Title: There is no idea of ​​working with Tiger - Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.