नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 05:34 PM2022-03-20T17:34:21+5:302022-03-20T17:34:52+5:30

The kashmir files: सध्या या चित्रपटाचे हाऊसफूल शो सुरु आहेत. मात्र, तरीदेखील हा चित्रपट OTT वर कधी येणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

the kashmir files ott platform zee 5 netflix amazon prime video kashmiri pandits | नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files

नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files

googlenewsNext

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांचा द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. उत्तम कथानक आणि योग्यरित्या केलेल्या मांडणीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी घोडदौड करत असल्याचं दिसून येत आहे. काश्मिरी पंडितांवर काश्मीरमध्ये कशाप्रकारे अत्याचार झाले आणि त्यांना तेथून पळ काढावा लागला यावर हा चित्रपट आधारित आहे. विशेष म्हणजे सध्या या चित्रपटाचे हाऊसफूल शो सुरु आहेत. मात्र, तरीदेखील हा चित्रपट OTT वर कधी येणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. यामध्येच आता हा चित्रपट कोणत्या ओटीटीवर पाहता येईल हे समोर आलं आहे.

या ओटीटीवर पाहता येणार काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच Zee5 स्ट्रिमिंग पार्टनर असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे हा चित्रपट जर ओटीटीवर रिलीज झाला तर तो सर्वात प्रथम Zee5  वरच प्रदर्शित होईल असं सांगण्यात येत आहे. तसंच सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट मे महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होऊ शकतो. विशेष म्हणजे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळत असल्यामुळे पुढील काही काळ तो चित्रपटगृहांमध्येच दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, झी नेटवर्कने द काश्मीर फाइल्सचे टेलिव्हिजन राइट्स घेतले आहेत. त्यामुळे हा चित्रपट मे २०२२मध्ये टीव्हीवरदेखील प्रदर्शित केला जाईल.मात्र, अद्याप प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही.

दरम्यान, द काश्मीर फाइल्स या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाने केवळ ९ दिवसांमध्ये १४१. २५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

Web Title: the kashmir files ott platform zee 5 netflix amazon prime video kashmiri pandits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.