ऐश्वर्य ठाकरेच्या 'निशांची' सिनेमातील पहिलं गाणं 'डिअर कंट्री' प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:16 IST2025-08-13T19:16:05+5:302025-08-13T19:16:21+5:30

'निशांची' (Nishanchi Movie) सिनेमातील पहिले गाणे 'डिअर कंट्री' (Dear Country) प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रसिद्ध संगीतकार ध्रुव घाणेकर यांनी संगीतबद्ध केले असून त्याला भावपूर्ण आवाज दिला आहे विजय लाल यादव यांनी आणि शब्द लिहिले आहेत प्यारेलाल देवनाथ यादव यांनी.

The first song 'Dear Country' from Aishwarya Thackeray's 'Nishanchi' released | ऐश्वर्य ठाकरेच्या 'निशांची' सिनेमातील पहिलं गाणं 'डिअर कंट्री' प्रदर्शित

ऐश्वर्य ठाकरेच्या 'निशांची' सिनेमातील पहिलं गाणं 'डिअर कंट्री' प्रदर्शित

'निशांची' (Nishanchi Movie) सिनेमातील पहिले गाणे 'डिअर कंट्री' (Dear Country) प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रसिद्ध संगीतकार ध्रुव घाणेकर यांनी संगीतबद्ध केले असून त्याला भावपूर्ण आवाज दिला आहे विजय लाल यादव यांनी आणि शब्द लिहिले आहेत प्यारेलाल देवनाथ यादव यांनी. डिअर कंट्री हे गाणे उत्तर भारतीय लोकसंगीताचा प्रभाव, खेळकर इंग्रजी ओळी, तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी सजलेले आहे. नाचायला लावणाऱ्या ठेक्यांसह हे गाणं आपल्या मनात घर करतं आणि चित्रपटाच्या 'देसी मसाला' भावना उत्तमपणे उलगडते.

 'डिअर कंट्री' या गाण्याचे व्हिडिओ देखील तितकेच रंगीत आणि जोशपूर्ण आहे. चित्रपटातील काही निवडक दृश्यांतून तयार केलेली एक वेगवान मोंटाज, ज्यामध्ये उच्च-भावनात्मक प्रसंग आणि मुलांचं त्यांच्या आईसाठीचं प्रेम दिसून येतं. ‘डिअर कंट्री’ हे एक संगीतमय, हृदयस्पर्शी आणि खेडूत रंगांनी नटलेलं मातृभूमीला वाहिलेलं प्रेमपत्र आहे. संगीतकार ध्रुव घाणेकर यांनी सांगितले, हे गाणं ऐकताक्षणी प्रेक्षकांना खेड्यांचं वातावरण जाणवावं, ही कल्पना होती. पारंपरिक सूरांपासून सुरुवात करून, त्यात देसी इंग्रजी मिसळली. जशी लहान गावांमधली लोकं बोलतात, अगदी मनातून. मला चित्रपटाच्या वेडसर आणि प्रेमळ कथानकाला जुळणं गरजेचं वाटलं. अनुराग कश्यप यांच्या चित्रपटांना खास साउंडट्रॅक असतोच, त्यामुळे मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि डिअर कंट्री तसंच झालं मजेशीर, आगळंवेगळं, मुळांशी जोडलेलं. 

निशांची हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला असून, अजय राय आणि रंजन सिंग यांनी जार पिक्चर्स अंतर्गत आणि फ्लिप फिल्म्स सहनिर्मित केला आहे. कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी लिहिलेली आहे. या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेचे दमदार रोल मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण होत आहे. त्यांच्या सोबत वेदीका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झीशान अय्युब आणि कुमुद मिश्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. निशांची दोन भाऊ आणि त्यांच्या टोकाच्या जीवनप्रवासाची कहाणी सांगतो – जिथे त्यांच्या निर्णयांचा परिणाम त्यांच्या नशिबावर कसा होतो हे पाहायला मिळेल. हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The first song 'Dear Country' from Aishwarya Thackeray's 'Nishanchi' released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.