'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 01:16 PM2024-01-13T13:16:10+5:302024-01-13T13:16:32+5:30

Don 3 : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'डॉन ३' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये याची घोषणा करण्यात आली होती.

The character of the actor, who played a negative role in 'Don 3', will have a tough fight with Ranveer Singh | 'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत

'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'डॉन ३' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. 'डॉन ३' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर चाहते खूप उत्सुक आहेत आणि त्याच्या रिलीजची वाट पाहत आहेत. आता 'डॉन ३' संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे जे चाहत्यांचा आनंद द्विगुणित करेल. वास्तविक, रणवीर सिंगच्या 'डॉन ३' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असलेल्या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. इमरान हाश्मी 'डॉन ३' चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

२०२३ मध्ये 'डॉन ३' चित्रपटाची घोषणा होताच त्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर रणवीर सिंगच्या एंट्रीने तो अधिक चर्चेत आला. चित्रपटाच्या घोषणेनंतर आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. वास्तविक, 'डॉन ३' चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारू शकतो, असे सांगितले जात आहे. इमरान हाश्मी चित्रपट निर्माता फरहान अख्तरच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाल्याचे बोलले जात आहे. इमरान हाश्मीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 'डॉन ३' चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'डॉन' सिनेमाबद्दल 

इमरान हाश्मी शेवटचा 'टायगर ३'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. 'टायगर ३' व्यतिरिक्त इमरान हाश्मीने 'मर्डर', 'गँगस्टर', 'वन्स अपॉन अ टाइम इन अ मुंबई', 'चेहरे' यांसारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. 'डॉन ३' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो फरहान अख्तर दिग्दर्शित करणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी करणार आहेत. 'डॉन ३' हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. २००६ मध्ये रिलीज झालेल्या 'डॉन' आणि २०११ मध्ये रिलीज झालेल्या 'डॉन २'मध्ये शाहरुख खान लीड रोलमध्ये होता.

Web Title: The character of the actor, who played a negative role in 'Don 3', will have a tough fight with Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.