'थामा' ट्रेलर रिलीज! हॉररचा थरार आणि कॉमेडीची मेजवानी; आयुषमान-रश्मिकाची दमदार केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:31 IST2025-09-27T11:31:03+5:302025-09-27T11:31:49+5:30
Thamma Trailer Out: बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि रश्मिका मंदाना यांच्या 'थामा' चित्रपटाबद्दल सध्या बरीच चर्चा आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपवत निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. रिलीज होताच या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

'थामा' ट्रेलर रिलीज! हॉररचा थरार आणि कॉमेडीची मेजवानी; आयुषमान-रश्मिकाची दमदार केमिस्ट्री
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा (Aayushman Khurana) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'थामा' (Thamma Movie) चित्रपटाबद्दल सध्या बरीच चर्चा आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपवत निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. रिलीज होताच या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दमदार डायलॉगने होते. यानंतर, त्यात आयुषमान खुराणाची धमाकेदार एंट्री दाखवली आहे. तो रश्मिका मंदानाच्या प्रेमात पडतो आणि इथूनच त्याच्या आयुष्याला एक जबरदस्त वळण लागते. ट्रेलरमध्ये परेश रावल अभिनेत्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाचा ट्रेलर एका मोठ्या कार्यक्रमात रिलीज करण्यात आला. यावेळी आयुषमान खुराणासोबत श्रद्धा कपूर देखील उपस्थित होती, जी लाल साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
'थामा' कधी रिलीज होणार?
आयुषमान खुराणा आणि रश्मिका मंदानाचा 'थामा' याच वर्षी म्हणजेच २१ ऑक्टोबर, २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. याव्यतिरिक्त, तुम्हाला या चित्रपटात 'भेड़िया' आणि 'स्त्री' ची झलकही पाहायला मिळेल. आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.
पहिल्यांदाच आयुषमानसोबत दिसणार रश्मिका
खरेतर, 'स्त्री' आणि 'मुंज्या' नंतर मॅडॉक या चित्रपटात एका व्हॅम्पायरची कथा घेऊन आला आहे. ज्यात हॉररसोबत कॉमेडीचा जबरदस्त तडका पाहायला मिळाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना पहिल्यांदाच अभिनेता आयुषमान खुराणासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी ही अभिनेत्री 'छावा' या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती, ज्यात तिची जोडी विकी कौशलसोबत पाहायला मिळाली होती.