हेमा मालिनी दिसणारा तेलगू चित्रपटात; ‘गौतमीपुत्र सतकर्णी’चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 21:39 IST2016-12-17T21:39:15+5:302016-12-17T21:39:15+5:30
Hema Malini Telgu film Gautamiputra Satakarni Theatrical Trailer Released ; मागील काही वर्षांपासून चित्रपटापासून दूर असलेल्या व राजकारणात सक्रिय असलेल्या हेमा मालिनी यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट आनंदाची पर्वणी ठरणार असल्याचे दिसते. हेमा मालिनी यांची भूमिका असणाºया ‘गौतमीपुत्र सतकर्णी’ या तेलगू चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे.

हेमा मालिनी दिसणारा तेलगू चित्रपटात; ‘गौतमीपुत्र सतकर्णी’चा ट्रेलर रिलीज
इसवी सनाच्या सुरुवातीला भारतातील दख्खन प्रांतावर राज्य करणाºया सतकर्णी राजाच्या साम्राज्यावर ‘गौतमीपुत्र सतकर्णी’ हा चित्रपट आधारित आहे. सतकर्णीला दक्षिण भारतात गौतमीपुत्र सतकर्णी म्हणून ओळखले जाते. तेलगू भाषेत तयार होणाºया या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक क्रिश करीत आहे. अभिनेता नंदमुरी बालकृष्णन हा या चित्रपटात सतकर्णीची भूमिका करीत आहे. तर त्याच्या आई गौतमीची भूमिका हेमा मालिनी साकारत आहे. यासोबतच श्रीया सरन व कबीर बेदी, शिवा राजकुमार व रवी प्रकाश यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
मागील काही वर्षांपासून चित्रपटापासून दूर असलेल्या व राजकारणात सक्रिय असलेल्या हेमा मालिनी यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट आनंदाची पर्वणी ठरणार असल्याचे दिसते. ट्रेलर पाहून यात हेमा मालिनी यांची भूमिका सशक्त व महत्त्वाची असल्याचे दिसते. श्रीया सरन ही वैष्णवीदेवीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमधील व्हिज्युअल इफेक्ट नजरेत भरणारे आहे. बाहुबलीप्रमाणेच या चित्रपटही भरपूर अॅक्शन पाहयाला मिळेल असे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञांच्या नावाचा उल्लेख करताना त्यांच्या नावा पुढे आईच्या नावाचा उल्लेख केला आहे. दिग्दर्शक क्रिश याने अंजनापुत्र क्रिश असे लिहिले आहे.