कंगना रणौतच्या 'इमरजन्सी'चं टिझर रिलीज, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:53 PM2023-06-24T13:53:42+5:302023-06-24T13:55:07+5:30

Emergency Teaser: खरे तर, यापूर्वी हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित केला जाणार होता. मात्र आता तो नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Teaser release of Kangana Ranaut's Emergency film, film emergency release on 24 november | कंगना रणौतच्या 'इमरजन्सी'चं टिझर रिलीज, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

कंगना रणौतच्या 'इमरजन्सी'चं टिझर रिलीज, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

googlenewsNext


नवी दिल्ली - कंगना रणौतच्या मोस्ट अवेटेड 'इमरजन्सी'ची रिलीज डेट (Emergency Release Date) समोर आली आहे. कंगनाने चित्रपटाचे टिझर शेअर करत, हा चित्रपट याच वर्षी 24 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, असे म्हटले आहे. खरे तर, यापूर्वी हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित केला जाणार होता. मात्र आता तो नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

1 मिनिट 12 सकेंदांचा हा टिझर शेअर करत कंगनाने म्हटले आहे, “रक्षक की हुकूमशहा? आपल्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसाचे साक्षिदार व्हा. आपल्या देशातील नेत्याने आपल्याच लोकांविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. इमरजन्सी 24 नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होत आहे.”

इमरजन्सी हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना राणौतने केले असून पटकथा रितेश शाहने लिहिली आहे.

'इमरजन्सी' हा चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा तत्कालीन प्रवास दर्शवतो. त्यांनी 1975 मध्ये घडलेल्या घटनांचा कशा प्रकारे सामना केला. हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी देशातील तिसऱ्या पंतप्रधान होत्या. 

Web Title: Teaser release of Kangana Ranaut's Emergency film, film emergency release on 24 november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.