Teaser poster out : मेरी सुलू! पलट सुलू!! का चेहरा लपवतेयं विद्या बालन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:28 IST2017-09-12T08:58:11+5:302017-09-12T14:28:47+5:30
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचे सौंदर्य आणि अभिनयाची जितकी प्रशंसा करावी, तितकी कमी आहे. विद्या जेव्हा-केव्हा पडद्यावर येते तेव्हा ...

Teaser poster out : मेरी सुलू! पलट सुलू!! का चेहरा लपवतेयं विद्या बालन?
ब लिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचे सौंदर्य आणि अभिनयाची जितकी प्रशंसा करावी, तितकी कमी आहे. विद्या जेव्हा-केव्हा पडद्यावर येते तेव्हा स्वत:ची एक वेगळी छाप सोडून जाते. विद्याचा अलीकडे आलेला ‘बेगम जान’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. पण आता विद्या पुन्हा एकदा चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी तयार आहे. होय, विद्याची मुख्य भूमिका असलेल्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाचे दुसरे टीजर पोस्टर आज रिलीज झाले. या पोस्टरमध्ये विद्या कमरेवर हात ठेवून उभी आहे. बाजूला एक गिफ्ट हँम्पर आहे. खांद्यावर बॅग असलेली विद्या खिडकीतून उडत्या पक्षाकडे बघतेय. खिडकीबाहेर एक पक्षी उंच आकाशात भरारी घेतोय आणि विद्या त्या पक्षाकडे मोठया उत्सुकतेने बघतेय.
![]()
यापूर्वीही ‘तुम्हारी सुलू’चे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यात विद्याच्या हातात भाजीपाल्याची पिशवी आणि काही गिफ्ट हँम्पर दिसले होते. ‘तुम्हारी सुलू’चे हे दोन्ही पोस्टर पाहिल्यावर एक कॉमन गोष्ट तुम्हाला जाणवेल. ती म्हणजे, या दोन्ही पोस्टरमध्ये विद्याचा चेहरा दाखवलेला नाही. याशिवाय ‘तुम्हारी सुलू’ची ही दोन्ही पोस्टर्स विद्याच्या व्यक्तिरेखेबद्दलही बरेच काही सांगणारी आहेत. आयुष्यात स्वातंत्र्य मिळवू इच्छिणाºया वा स्वतंत्र अस्तित्व असलेल्या महिलेच्या भूमिकेत विद्या यात दिसू शकते. अर्थात तूर्तात तरी हा अंदाज आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतरच विद्याच्या व्यक्तिरेखेबद्दल आपल्याला खरे काय ते कळू शकणार आहे. तूर्तास तरी विद्या या चित्रपटात एका रेडिओ जॉकीच्या भूमिकेत आहे, एवढेच काय ते आम्हाला ठाऊक आहे. रात्रीचा शो होस्ट करणारी आरजेची कथा यात आपण पाहणार आहोत. यापूर्वी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात विद्या आरजेच्या भूमिकेत दिसली होती.
ALSO READ : तुम्हारी सुलू या चित्रपटातील विद्या बालन तुम्ही पाहिलीत का?
आज टीजर पोस्टर रिलीज झाल्यानंतर येत्या गुरुवारी या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला जाणार आहे. तोपर्यंत ‘तुम्हारी सुलू’चे नवे टीजर पोस्टर पाहा आणि ते कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स लिहू शकता.