teaser out : ​‘कालाकांडी’मध्ये अशा विचित्र रूपात दिसणार सैफ अली खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 15:46 IST2017-07-14T10:16:25+5:302017-07-14T15:46:25+5:30

सैफ अली खान लवकरच मोठ्या पडद्यावर शानदार एन्ट्री करणार आहे. होय, त्याचा आगामी चित्रपट ‘कालाकांडी’चे फर्स्ट लूक जारी झालेय. फर्स्ट लूकनंतर लगेच चित्रपटाचा टीजरही रिलीज करण्यात आला.

teaser out: Saif Ali Khan will appear in such a strange form in 'Kalakandi' | teaser out : ​‘कालाकांडी’मध्ये अशा विचित्र रूपात दिसणार सैफ अली खान!!

teaser out : ​‘कालाकांडी’मध्ये अशा विचित्र रूपात दिसणार सैफ अली खान!!

फ अली खान लवकरच मोठ्या पडद्यावर शानदार एन्ट्री करणार आहे. होय, त्याचा आगामी चित्रपट ‘कालाकांडी’चे फर्स्ट लूक जारी झालेय. फर्स्ट लूकनंतर लगेच चित्रपटाचा टीजरही रिलीज करण्यात आला. यात सैफचा अवतार तुम्हा-आम्हाला आश्चर्याचा धक्का देणारे आहे. होय, या लूकमध्ये सैफने पांढºया रंगाचा शर्ट आणि त्यावर पिवळ्या रंगाचे फर जॅकेट घातलेले आहे. त्याच्या डोक्यावर अनेक वेण्या बांधलेल्या आहेत. डोळ्यांच्या चहूबाजूंनी काळेपणा दिसतोय. असे का, याचा अंदाज तूर्तास बांधता येणार नाही. पण सैफचा लूक नक्कीच जबरदस्त आहे.
टीजरचे म्हणाल तर टीजरच्या सुरूवातीला सैफ नॉर्मल लूकमध्ये दिसतो. तिच्यासमोर एक महिला अतिशय अवघडलेल्या स्थितीत उभी आहे. यानंतर काही क्षणात सैफ पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसतो. एकंदर काय तर हा चित्रपट म्हणजे अ‍ॅक्शन, थ्रिल आणि रोमान्स असे सगळे पॅकेज असल्याचे टीजर पाहून वाटतेय. खरे तर हा डार्क कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्याला कॅन्सर झालाय, हे माहित झाल्यानंतर सैफची मानसिक स्थिती बिघडते, अशी याची कथा आहे. या चित्रपटात आणखी काय काय आहे, हे बघायचे तर आपल्याला रिलीजची प्रतीक्षा करणे भाग आहे. अर्थात तोपर्यंत आपण टीजर पाहू शकतो.



  या चित्रपटाद्वारे अक्षत वर्मा डायरेक्शन डेब्यू करतो आहे. यापूर्वी अक्षतने ‘डेली बेली’ची पटकथा लिहिली होती. या चित्रपटात सैफशिवाय कुणाल राय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, अक्षय ओबेराय, इशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील आदी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या ८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

Web Title: teaser out: Saif Ali Khan will appear in such a strange form in 'Kalakandi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.