'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:00 IST2025-08-29T17:59:46+5:302025-08-29T18:00:10+5:30
अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये विनोद आणि रोमान्सचा एक उत्तम तडका आहे.

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये विनोद आणि रोमान्सचा एक उत्तम तडका आहे. यात वरुण आणि जान्हवी यांच्यासोबतच सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ यांच्याही व्यक्तिरेखांची ओळख करून देण्यात आली आहे.
धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर टीझर रिलीज केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "चार लोक, दोन मनं तोडणारे, एक लग्न. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. तो २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल." १ मिनिटांचा हा टीझर वरुण धवनच्या मजेदार शैलीने सुरू होतो, जिथे तो बाहुबली अवतारात दिसतो. वरुण मजेदार पद्धतीने विचारतो, "मी बाहुबलीसारखा दिसत आहे ना?" त्यानंतर मित्र विनोदी अंदाजात उत्तर देतो की, 'रणवीर सिंह की धोती में प्रभास का पौधा लग रहा है'. यानंतर वरुण स्वतःची ओळख "संस्कारी सनी" अशी करून देतो. टीझरमध्ये जान्हवी कपूर आणि कथेत ट्विस्ट आणणाऱ्या इतर पात्रांची झलक देखील दाखवण्यात आली आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूरची जोडी पडद्यावर दिसते आणि टीझर संपतो. या चित्रपटात कॉमेडी, रोमान्स आणि डान्स यांचा मजेदार संगम पाहायला मिळेल.
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटात वरुण आणि जान्हवी पुन्हा एकदा स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत. यापूर्वी दोघांनी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बवाल' चित्रपटात एकत्र काम केले होते. जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांच्याव्यतिरिक्त, अक्षय ओबेरॉय, रोहित सराफ, सान्या मल्होत्रा आणि मनीष पॉल हे देखील शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.