‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेची भूमिका साकारणार तापसी पन्नू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 15:31 IST2017-07-29T10:01:08+5:302017-07-29T15:31:08+5:30

सध्या अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण बॉलिवूडमध्ये तापसीकडे सध्या ...

Tapi Pannu will play the role of Rishi Kapoor's list of 'Mulk' | ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेची भूमिका साकारणार तापसी पन्नू!

‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेची भूमिका साकारणार तापसी पन्नू!

्या अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण बॉलिवूडमध्ये तापसीकडे सध्या भावी सुपरस्टार म्हणून बघितले जात आहे. एकापाठोपाठ चित्रपटांच्या आॅफर्स मिळत असल्याने तापसी सध्या खूश आहे. सध्या तापसी वरुण सोबत ‘जुडवा-२’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची शूटिंग लवकरच पूर्ण होणार असून, संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. दरम्यान, आता आलेल्या माहितीनुसार तापसीने एक नवा चित्रपट साइन केला असून, त्यामध्ये ती अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर दिसणार आहे. 

अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘मुल्क’ असे आहे. उर्दूमध्ये देशाला ‘मुल्क’ असे म्हटले जाते. चित्रपटात ऋषी तापसीच्या सासºयांच्या भूमिकेत दिसतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर ऋषी तापसीच्या सासºयांच्या भूमिकेत असतील तर मग तापसीचा पती कोण? तर याबाबतची अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा केली नसल्याने ते नाव समोर आलेले नाही. दरम्यान, ‘मुल्क’ हा चित्रपट सोशल थ्रिलर असून, एका सत्य घटनेवर आधारित असेल. चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास, तापसी तिच्या सासºयाच्या प्रतिष्ठेसाठी लढा देताना दिसणार आहे. कथेचा विषय खूपच दमदार असल्याने असे वाटत आहे की, तापसीला ‘नाम शबाना’नंतर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

साउथ इंडस्ट्रीमधून आलेल्या तापसीला ‘पिंक’ या चित्रपटानंतरच बॉलिवूडमध्ये खºया अर्थाने ब्रेक मिळाला. आज तिच्याकडे अनेक चांगले चित्रपट आहेत. शिवाय प्रेक्षकांनीही तिचा स्वीकार केल्याने आगामी काळात तापसी एक दमदार अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करू शकेल. दरम्यान, ‘मुल्क’ या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात केली जाणार असून, तापसी ‘जुडवा-२’चे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. चित्रपटाचे शूटिंग वाराणसी आणि लघनऊ या शहरांमध्ये केले जाणार आहे. 

Web Title: Tapi Pannu will play the role of Rishi Kapoor's list of 'Mulk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.