अफेअरच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटियाने शेअर केले गोव्या व्हॅकेशनचे फोटो, नेटिझन्स म्हणाले-विजय वर्मा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 10:46 AM2023-01-07T10:46:20+5:302023-01-07T10:50:15+5:30

तमन्नाने तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ते पाहून लोकांनी तिला विजय वर्माबाबत प्रश्न विचारला आहे.

Tamannaah Bhatia celebrated new year in goa actress shared pictures and video of vacation | अफेअरच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटियाने शेअर केले गोव्या व्हॅकेशनचे फोटो, नेटिझन्स म्हणाले-विजय वर्मा...

अफेअरच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटियाने शेअर केले गोव्या व्हॅकेशनचे फोटो, नेटिझन्स म्हणाले-विजय वर्मा...

googlenewsNext

Tamannaah Bhatia Goa Pics:तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे कपल सध्या चर्चेत आहे. न्यू ईअरला एकमेकांना किस करतानाचा दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. तेव्हा पासून दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा बी-टाऊनमध्ये जोरदार रंगल्या आहेत. नव्या वर्षाचं स्वागत तमन्ना आणि विजयने गोव्यात एकत्र केलं. त्यांच्या व्हायरल झालेल्या किसिंग व्हिडिओनं दोघांचं नातं कंन्फर्म केलं. दोघांनीही यावर अद्याप कोणतीच कमेंट  केलेली नाही.

तमन्नाने शेअर केले गोव्या व्हॅकेशनचं फोटो
आता तमन्नाने तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तमन्ना स्वत:चे सिंगल फोटो शेअर केले आहेत, यात ती कधी रेस्टोरेंटमध्ये तर कधी गोव्याच्या बीचवर एन्जॉय करताना दिसतेय. तमन्ना आमिर खानचा 'दिल चाहता है'मधला एक सीनसुद्धा रीक्रिएट करताना दिसतेय. तमन्नाने शेअर केलेले फोटो बघून नेटकऱ्यांनी तिला विजय वर्मा कुठे आहे असं विचारायला सुरुवात केली आहे.  


 'लस्ट स्टोरीज 2'च्या सेटवर झाली होती पहिली भेट 
काही दिवसांपूर्वी तमन्ना आणि विजय यांनी दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र हजेरी लावली होती. विजयने आपल्या पोस्टमध्ये "हॉट पिझ्झा पार्टनर" असे लिहिले आहे. पांढऱ्या टॉप आणि जीन्समध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना आणि विजयची भेट 'लस्ट स्टोरीज 2'च्या सेटवर झाली होती आणि इथूनच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.


 

Web Title: Tamannaah Bhatia celebrated new year in goa actress shared pictures and video of vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.