सलमानवर टीका केल्याने चाहते खवळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 16:36 IST2016-06-22T11:04:55+5:302016-06-22T16:36:37+5:30

दिल्ली बेल्ली आणि खुबसूरत सारख्या चित्रपटातील गायिका सोना महापात्राला सलमान खानवर टीका करणे चांगलेच महागात पडले. सलमानच्या चाहत्यांनी ट्विरवर ...

Talking about Salman, fans fluttered, screaming | सलमानवर टीका केल्याने चाहते खवळले

सलमानवर टीका केल्याने चाहते खवळले

ल्ली बेल्ली आणि खुबसूरत सारख्या चित्रपटातील गायिका सोना महापात्राला सलमान खानवर टीका करणे चांगलेच महागात पडले. सलमानच्या चाहत्यांनी ट्विरवर तिच्यावर जोरदार हल्ला केला.
एका पत्रकाराने ट्विटरवर म्हटले की, सलमान खानने आपल्या ‘सुलतान’ या चित्रपटाच्यात चित्रीत करण्यात आलेल्या कुस्तीच्या दृष्यानंतर त्याला बलात्कारित महिलासारखे वाटले हे वक्तव्य केले, त्यावेळी तो स्वत: उपस्थित होता. पत्रकाराच्या अनुसार सलमान खानच्या वक्तव्यासंदर्भात जो अर्थ काढण्यात आला तो चुकीचा आहे.


यावर सोनाने पत्रकाराच्या ट्विटवर लिहिले की, ‘महिलांवर हात उचलण्यात आला... लोकांच्या अंगावर गाडी चढविली... वन्य प्राण्यांना नष्ट केले.... तरीही हा देशाचा हिरो आहे... हे चुकीचे आहे... भारतामध्ये अशा समर्थकांची संख्या खूप आहे’.


ट्विटरवर #SalmanMisquoted हॅशटॅगवरील सलमान समर्थकांनी सोनावर हल्ला चढविला. अत्यंत घाणेरड्या शब्दात तिच्यावर टीका करण्यात आली. काही ट्विट प्रकाशित करणे देखील योग्य ठरणार नाही. 
सोना महापात्रा देखील मागे हटली नाही. ती आपल्या शब्दांवर कायम राहिली. तिनेही जोरदार वाक्यात समर्थकांना फटकारले. ‘भाईच्या चमच्यांनो, तुमच्या अत्यंत घाणेरड्या, अश्लील आणि निम्नस्तरीय पोस्टमुळे माझे शब्द खरे करीत आहात.... हा.. हा...

सोनाने सलमानबाबतही लिहिले आहे. ‘सलमान खानने वक्तव्य केल्यानंतर ते मागे घेण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे असे लक्षात येते की त्याला या गोष्टीची जाण आहे. आपण किती चुकीचे बोललो होतो. त्यामुळे आता माफी मागितल्याने कोणतेही नुकसान होणार नाही.


सोनाने सलीम खान यांच्या वक्तव्यावरही आपली बाजू मांडली. ‘करोडो लोकांचा प्रिय आदर्श... प्रत्येक दिवशी आपल्या वडिलांकडून माफी मागणे योग्य नव्हे. आपल्या वागण्यात बदल करा आणि आपल्या समर्थकांना काही चांगले बोलण्याबाबतही सांगा...’

 

Web Title: Talking about Salman, fans fluttered, screaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.