"कपडे काढ आणि नाच...", जेव्हा सेटवर दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:01 IST2025-12-31T18:00:39+5:302025-12-31T18:01:44+5:30

अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने एका चित्रपट दिग्दर्शकाने सेटवर तिच्याशी केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.

"Take off your clothes and dance...", when the director misbehaved with a famous actress Tanushree Dutta on the set | "कपडे काढ आणि नाच...", जेव्हा सेटवर दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

"कपडे काढ आणि नाच...", जेव्हा सेटवर दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाते. ती तिचे मत मांडताना कोणाचीही भीती बाळगत नाही. तनुश्रीने एका मुलाखतीत नाव न घेता सांगितले की, एका दिग्दर्शकाने तिला 'कपडे काढून नाच' असे म्हटले होते. तनुश्रीला या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटले होते. आता तिची ही जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

'पिंकविला'शी बोलताना तनुश्री दत्ता म्हणाली होती की, "चित्रपटाच्या सेटवर, तुम्ही काही इतके मोठे दिग्दर्शकही नाही आहात. मग तुम्ही अशा प्रकारे उद्धटपणे का बोलत आहात? 'कपडे काढून नाच', असे तो म्हणाला होता. मला माझा गाउन काढायचा होता, पण तीच गोष्ट तुम्ही सभ्य भाषेतही सांगू शकला असता ना? तिथे त्यावरून वाद झाला होता. त्या दिवसात मी खूप शांत होते, त्यामुळे मी फक्त त्याच्याकडे बघितले आणि गप्प राहिले. पण तिथे उपस्थित असलेल्या इतर कलाकारांनाही हे ऐकून खूप वाईट वाटले होते. सर्वांनी मला पाठिंबा दिला होता, त्यामुळेच तो दिग्दर्शक गप्प झाला. त्याची पद्धतच वाईट आहे, त्याला बोलण्याची शिस्त नाही."


तनुश्री पुढे म्हणाली, "त्या सीनमध्ये मी जे कपडे घातले होते ते आधीच रिव्हिलिंग होते. मला पाण्याखाली डान्स करायचा होता. पण एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीशी आणि 'मिस इंडिया' राहिलेल्या मुलीशी बोलण्याची ही पद्धत नाही. मी याविरोधात आवाज उठवला, म्हणजे काय तर मीडियाशी बोलताना सहज याबद्दल सांगितले होते. मी त्या दिग्दर्शकाचे नावही घेतले नव्हते, पण तो स्वतःच समोर आला आणि आजही यावर मुलाखती देत असतो."

वर्कफ्रंट
तनुश्री दत्ताने तिच्या करिअरमध्ये 'आशिक बनाया आपने', 'चॉकलेट', 'भागम भाग', '३६ चायना टाऊन', 'ढोल', 'रिस्क', 'गुड बॉय बॅड बॉय' आणि 'अपार्टमेंट' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 

Web Title : तनुश्री दत्ता ने सेट पर निर्देशक की अनुचित मांग का खुलासा किया।

Web Summary : तनुश्री दत्ता ने एक निर्देशक द्वारा 'कपड़े उतारकर नाचने' की अपमानजनक मांग का वर्णन किया। उन्होंने अपनी असहजता और मौजूद अन्य अभिनेताओं से मिले समर्थन को व्यक्त किया। दत्ता ने निर्देशक के गैर-पेशेवर व्यवहार और सम्मान की कमी पर प्रकाश डाला, और पहले निर्देशक का नाम लिए बिना घटना के खिलाफ बोलने का उल्लेख किया।

Web Title : Tanushree Dutta reveals director's inappropriate demand on set.

Web Summary : Tanushree Dutta recounted a director's offensive demand to 'strip and dance.' She expressed her discomfort and the support she received from other actors present. Dutta highlighted the director's unprofessional behavior and lack of respect, emphasizing the revealing nature of her costume already. She mentioned speaking out against the incident without initially naming the director.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.