स्वरा भास्करने मानले उत्तर प्रदेश, बिहारचे आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 19:16 IST2017-03-09T13:46:45+5:302017-03-09T19:16:45+5:30

आपल्या कारकीर्दीत उत्तर प्रदेश आणि बिहारचे मोठे योगदान असल्याचे मत अभिनेत्री स्वरा भास्कर हिने व्यक्त केले आहे.  उत्तर प्रदेश ...

Swara Bhaskar considers Uttar Pradesh, Bihar's thanks! | स्वरा भास्करने मानले उत्तर प्रदेश, बिहारचे आभार!

स्वरा भास्करने मानले उत्तर प्रदेश, बिहारचे आभार!

ल्या कारकीर्दीत उत्तर प्रदेश आणि बिहारचे मोठे योगदान असल्याचे मत अभिनेत्री स्वरा भास्कर हिने व्यक्त केले आहे. 
उत्तर प्रदेश आणि बिहार यांना माझ्या आयुष्यात महत्त्व आहे. ज्यावेळी मला मोठे यश मिळाले आहे, त्यावेळी मी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पात्रांची भूमिका केली होती. ‘रांझणा, तनू वेडस् मनु, नील बट्टे सन्नाटा किंवा अनारकली आॅफ आरा’ या चित्रपटांमध्ये मी या दोन राज्यातील पात्रे साकारली आहेत. 
पीटीआयशी बोलताना स्वरा म्हणाली, ‘मला अनारकलीसारख्या पात्रांची काहीही माहिती नाही. मी नवी दिल्ली आणि मुंबई इथे वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश दास यांनी मला ज्या महिला द्विअर्थी गाणी गातात आणि नृत्य करतात अशांची यू ट्यूब लिंक पाठविली होती.’
स्वरा म्हणाली, ‘त्यांनी मला याविषयी अभ्यास करण्यास सांगितले. त्याशिवाय शारीरिक हालचाली आणि नृत्यांची स्टाईलही पाहण्यास सांगितले होते. मी आरा येथे जाऊन अशा गायकांची भेट घेतली होती.’
२००९ साली स्वरा भास्करने माधोलाल कीप वॉकिंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. स्वरा म्हणते, कलाकारांना चित्रपट स्वीकारण्याचे फारसे अधिकार नसतात, फक्त कोणत्या भूमिका स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचेच तिला स्वातंत्र्य असते. मला जे काही आवडले त्याच भूमिका करावयास मिळाल्या याचा आनंद आहे.



Web Title: Swara Bhaskar considers Uttar Pradesh, Bihar's thanks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.