सुझान -अर्जुन कॅफेत दिसले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:29 IST2016-01-16T01:20:21+5:302016-02-08T05:29:53+5:30
सोशल मीडियात चर्चेत असलेल्या वृत्तांनुसार सुझान खान आणि अर्जुन रामपाल एका कॅफेत एकत्र दिसले. या दोघांचं प्रेमप्रकरण असल्याच्या वृत्ताचा ...

सुझान -अर्जुन कॅफेत दिसले एकत्र
स शल मीडियात चर्चेत असलेल्या वृत्तांनुसार सुझान खान आणि अर्जुन रामपाल एका कॅफेत एकत्र दिसले. या दोघांचं प्रेमप्रकरण असल्याच्या वृत्ताचा या दोघांनीही इन्कार केला होता. पण, हे दोघे नुकतेच एका कॅफेत बसलेले दिसले. ते जेव्हा या कॅफेत आले तेव्हा येथे कुणीही नव्हतं. हे दोघंही तेथे भान हरपून बसले होते. मात्र, त्या कॅफेत हळूहळू गर्दी वाढू लागली. याची जाणीव या दोघांनाही नव्हती. मात्र, तेथील ग्राहकांनी या दोघांना ओळखलं. तेव्हा त्यांनी तेथून पाय काढता घेतला. हृतिक रोशन आणि सुझाननं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मे २0१४ मध्ये हे दोघे विभक्त झाले होते. सुझान ही हृतिकच्या जवळच्या मित्राशी विवाहबद्ध होणार, अशा अफवा होत्या. तो जवळचा मित्र म्हणजे अर्जुन रामपाल होता, असे संकेत मिळत होते.