१० व्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना सुष्मिता सेनने दिला पूर्णविराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 15:54 IST2017-12-06T10:24:29+5:302017-12-06T15:54:29+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिचे नाव गेल्या काही काळापासून ऋतिक भसीन यांच्याशी जोडले जात आहे. ...

Sushmita Senna gave a break with the 10th boyfriend! | १० व्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना सुष्मिता सेनने दिला पूर्णविराम!

१० व्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना सुष्मिता सेनने दिला पूर्णविराम!

लिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिचे नाव गेल्या काही काळापासून ऋतिक भसीन यांच्याशी जोडले जात आहे. कारण बºयाचदा हा दोघांना एकत्र बघण्यात आले आहे. परंतु या दोघांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्याही चर्चा समोर येत असल्याने, त्यांचे ब्रेकअप तर झाले नाही ना? अशी चर्चा रंगत आहे. दरम्यान, आता या चर्चांना ब्रेक मिळाला असून, सुष्मितानेच यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. होय, सुष्मिता नुकतीच बॉयफ्रेंड ऋतिक भसीन याच्यासोबत पार्टीत बघावयास मिळाली. दोघे एकमेकांसोबत खूपच खुश आणि कम्फर्टेबल दिसत होते. त्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना आता काहीसा पूर्णविराम मिळाला, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 

दरम्यान, सुष्मिताने आतापर्यंत निर्माता विक्रम भट्ट, दिग्दर्शक मुदस्सर अजीज, संजय नारंग, अभिनेता रणदीप हुड्डा, बिल्डर इम्तियाज खत्री, बंटी सचदेव, उद्योगपती अनिल अंबानी आणि माजी पाकिस्तान क्रिकेटपटू वसीम अक्रम याला डेट केले आहे. नुकत्याच झालेल्या जहीर खान आणि सागरिकाच्या लग्नात ऋतिक भसीनच्या मित्रांनी त्याची आणि सुष्मिताच्या लग्नावरून चांगलीच चेष्टा केली होती. आता हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 



दरम्यान, दोघांचे ब्रेकअप झाले नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्यातील रोमान्स चर्चेचा विषय ठरत आहे. सुष्मिताबद्दल सांगायचे झाल्यास, गेल्या काही काळापासून ती मोठ्या पडद्यावरून गायब झाली आहे. सुष्मिताचे चाहते तिच्या पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, सुष्मिता छोट्या पडद्यावर लवकरच झळकणार आहे. परंतु तशी शक्यता नसल्याने, सुष्मिता केव्हा पुनरागमन करणार यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 

Web Title: Sushmita Senna gave a break with the 10th boyfriend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.