सलमान खानवर या एका कारणामुळे सुश्मिता सेन झाली होती नाराज, मग घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 08:00 AM2023-04-02T08:00:00+5:302023-04-02T08:00:00+5:30

Salman Khan And Sushmita Sen: सुश्मिता सेनला सलमान खानसोबत कोणत्याही चित्रपटात काम करायचे नव्हते. या गोष्टीचा खुलासा इतर कोणी नाही तर खुद्द भाईजाननेच केला आहे.

Sushmita Sen was upset with Salman Khan due to this one reason, then something like this happened... | सलमान खानवर या एका कारणामुळे सुश्मिता सेन झाली होती नाराज, मग घडलं असं काही...

सलमान खानवर या एका कारणामुळे सुश्मिता सेन झाली होती नाराज, मग घडलं असं काही...

googlenewsNext

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) याच्या मैत्रीची किस्से जितके ऐकायला मिळत आहेत, तितकेच लोकांशी वैर आणि नाराजीबद्दलही चर्चा ऐकायला मिळते. सलमान खान आणि सुश्मिता सेन(Sushmita Sen)ने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण एक काळ असा होता जेव्हा सुश्मिता सेनला सलमान खानसोबत कोणत्याही चित्रपटात काम करायचे नव्हते. याचा खुलासा इतर कोणी नाही तर खुद्द सलमान खानने मुलाखतीत केला आहे. 

सलमान खानने त्याच्या जुन्या मुलाखतीत सुश्मिता सेनसोबतच्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला होता. सुश्मिता सेनसोबतची पहिली भेट खूपच असभ्य होती, असे सलमानने म्हटले होते. जेव्हा मी 'बिवी नंबर १' च्या सेटवर दोन तास उशिरा पोहोचलो आणि डेव्हिड धवन यांनी सुश्मिताची ओळख करून दिली तेव्हा तिने चांगला प्रतिसाद दिला नाही. 'जीना इसी का नाम है' या शोमध्ये सलमान खानचा हा व्हिडिओ मेसेज दाखवण्यात आला होता.

सलमान खान म्हणाला- 'मी सुष्मिताला विचारले होते 'हाय, सुश कशी आहेस? ती फक्त हात दाखवून निघून गेली. मी डेविड धवन यांना विचारले की काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणाले की ९ वाजल्यापासून तिचा मेकअप करून ती तयार आहे. त्यासाठी ती ७ वाजता उठली. यावर सलमान खान म्हणाला की, ही माझी अडचण नाही, मी आधीच सांगितले होते की मी ११ किंवा ११.३० पर्यंत येईन.


सलमान खान पुढे म्हणाला की, सुश्मिता सेनसोबत त्याची मैत्री मियामीमध्ये 'बीबी नंबर १'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. सुष्मिताने लिमोझिन भाड्याने घेतली आणि संपूर्ण स्टाफसोबत नाईट क्लबमध्ये गेली. शॅम्पेनची ऑर्डर दिली आणि उत्तम जेवणाची ऑर्डर दिली. टीमला खूप आनंद झाला. तेव्हापासून तिच्याबद्दलचे माझे मत बदलले आणि आमची मैत्री झाली.

Web Title: Sushmita Sen was upset with Salman Khan due to this one reason, then something like this happened...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.