ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपवर सुष्मिता सेनचं भाष्य, ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 04:41 PM2023-08-05T16:41:04+5:302023-08-05T16:41:28+5:30

ललित मोदी आणि सुष्मिता सेनचं ब्रेकअप? अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Sushmita Sen said im single talk about relationship with lalit modi gave reply to trollers | ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपवर सुष्मिता सेनचं भाष्य, ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपवर सुष्मिता सेनचं भाष्य, ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिली आहे. गेल्या वर्षी आयपीएलचे माजी चेअरमॅन ललित मोदींनी सुष्मिता सेनबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. सुष्मिता सेनबरोबरचे काही फोटो सोशल मीडिया शेअर करत पोस्टमध्ये अभिनेत्रीचा ‘बेटर हाफ’ असा उल्लेख केला होता. त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. आता वर्षभरानंतर सुष्मिताने पहिल्यांदाच ललित मोदींबरोबरच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे.

ललित मोदींबरोबरचे मालदीव ट्रीपचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सुष्मिताला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने यावर भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं. सुष्मिता म्हणाली, “या प्रकारच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचल्या, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच मी गोल्ड डिगर या शब्दाला समजू शकले. अपमान हा अपमानच असतो. जो मी सहन करत नाही. पण, अशा काही गोष्टी आहेत, ज्याच्याशी कोणाला काही घेण देणं असलं नाही पाहिजे. मला हे सांगायची आवश्यकता नाही, पण तरीही हे मला सांगायचं आहे. सध्या मी सिंगल आहे आणि या गोष्टीशीही तुम्हाला घेणं देणं नसलं पाहिजे.”

“माझी बायको...”, रितेश देशमुखने जिनिलीयासाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

ललित मोदींबरोबरचे फोटो व्हायरल झाल्यानंतरही ट्रोल करणाऱ्यांनी सुष्मिताने सुनावलं होतं. सुष्मिताने पोस्ट शेअर करत त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. याबाबतही तिने मुलाखतीत भाष्य केलं. “ती पोस्ट शेअर केल्यानंतर मला याबाबत बोलण्याची गरज नाही, असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण, या गोष्टी माझ्याशी संबंधित आहेत, तर मी त्याबद्दल बोलणार,” असं सुष्मिता म्हणाली.

"तुमचा बिअर बार आहे का?", समीर वानखेडेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, "डान्स बार..."

दरम्यान, सुष्मिता 'ताली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात सुष्मिता सेन तृतीयपंथीयांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Sushmita Sen said im single talk about relationship with lalit modi gave reply to trollers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.