गंभीर आजारशी झुंज देत मरणाच्या दारातून परत आली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:04 IST2020-03-31T19:43:17+5:302020-03-31T20:04:48+5:30
एका इंटरव्हु दरम्यान तिने स्वत: हा खुलासा केला होता.

गंभीर आजारशी झुंज देत मरणाच्या दारातून परत आली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री
सुश्मिता सेन दीर्घकाळापासून चित्रपटांमधून गायब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. पण चर्चेत राहणे मात्र ती विसरत आहे. बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतच्या रिलेशनशीपमुळे ती चर्चेत असते. सुश्मिता सेनने एका इंटरव्हु दरम्यान सांगितले की, 2014 मध्ये एका बंगाली सिनेमा 'निरबाक'च्या शूटिंग दरम्यान ती खूप आजारी पडली होती. डॉक्टरांना कळते नव्हते की नक्की तिला काय झालंय आहे. एक दिवस ते बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर कळले की शरीरात कॉर्टिसोल हॉर्मोन बनत नाहीत. तिचं नशीब चांगले होते म्हणून ती वाचली. सुश्मिताने पूर्ण हिमतीने या आजाराचा सामना केला.
रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला.
या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती. कारण सुश्मिता कधीच आपल्या इन्स्टा हँडलवरचा डीएम अर्थात डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन कधी ओपन करत नव्हती.एकदिवस सुश्मिता आपल्या मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक चुकून तिच्या हातून डायरेक्ट मॅसेजचे आॅप्शन ओपन झाले आणि रोहमनचा मॅसेज तिला मिळाला. रोहमनचा हा मॅसेज सुश्मिताला इतका आवडला की, तिने लगेच त्यावर रिप्लाय केला. . चर्चा खरी मानाल तर, रोहमनने कधीच सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले आहे आणि सुशनेही त्याचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आहे.