सुशांत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या दिग्दर्शकाला बजावला समन्स, बॉलिवूड विश्वात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 04:54 PM2020-07-23T16:54:47+5:302020-07-23T16:55:14+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. ज्यामुळे बॉलिवूड जगतात खळबळ माजली आहे.

Sushant's suicide case: The police issued summons to the director, a sensation in the Bollywood world | सुशांत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या दिग्दर्शकाला बजावला समन्स, बॉलिवूड विश्वात खळबळ

सुशांत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या दिग्दर्शकाला बजावला समन्स, बॉलिवूड विश्वात खळबळ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वांद्रे पोलिसांनी दिग्दर्शक रुमी जाफरीला समन्स पाठवला आहे. वांद्रे पोलिसांनी रुमी जाफरीला पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवायला सांगितला आहे. रुमी जाफरीने सोशल मीडियावर रिया चक्रवर्तीची बाजू घेतली होती आणि सुशांतच्या निधनासाठी तिला जबाबदार ठरवणाऱ्या लोकांना खडेबोल सुनावले होते. रुमी जाफरने सोशल मीडियावर हेदेखील लिहिले होते की, रिया चक्रवर्ती किंवा या प्रकरणाशी निगडीत सेलिब्रेटींना काही झाले तर जबाबदार कोण असेल?

सुशांत सिंग राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती एका रोमँटिक कॉमेडी सिनेमात काम करणार होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी करणार होते. याबद्दल रुमी जाफरी म्हणाला होता की, सुशांत व रिया दोघेही या प्रोजेक्टबाबत खूश होते. ते दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार होते. पण त्यापूर्वीच सुशांतने आत्महत्या केली.


एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रुमी जाफरीने सुशांत व रियाच्या ब्रेकअपच्या अफवांवर रिएक्ट केले होते. रुमी म्हणाले की, सुशांत या प्रोजेक्टबाबत खूप उत्सुक होते आणि त्यासाठी ते वर्कशॉप व रिहर्सलला त्यांनी सुरूवातदेखील केली होती.

त्या दोघांमध्ये सुरू असलेल्या प्रॉब्लेमवरील प्रश्नावर रुमी जाफरीने सांगितले की, सुशांतने याबद्दल कधीच सांगितले नाही आणि रियानेदेखील सांगितले नाही. त्यांनी कधीच याबद्दल सांगितले नाही.

Web Title: Sushant's suicide case: The police issued summons to the director, a sensation in the Bollywood world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.