सुशांत टॉवेल लूकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 14:49 IST2016-08-02T09:19:44+5:302016-08-02T14:49:44+5:30
टीव्ही सिरियलपासून सुरु झालेला सुशांत सिंह राजपूतचा आजपर्यंतचा प्रवास चांगला राहीला आहे. ‘पवित्र रिश्ता’ या सिरियलमुळे तो तरुणींचा धडकन ...

सुशांत टॉवेल लूकमध्ये
टीव्ही सिरियलपासून सुरु झालेला सुशांत सिंह राजपूतचा आजपर्यंतचा प्रवास चांगला राहीला आहे. ‘पवित्र रिश्ता’ या सिरियलमुळे तो तरुणींचा धडकन बनलेला आहे. मॉरिशस मध्ये एका फोटोमध्ये तो टॉवेलमध्ये असल्याचा दिसत आहे. हा लूक पाहून त्याचे चाहते दिवाने झाल्याशिवाय राहणार नाहीत. सुशांत सध्या आपली येणारा चित्रपट ‘राबता’ च्या शुटींगसाठी मॉरिशसमध्ये आहे. तिथे तो टॉवेलवर असल्याचे दिसत आहे. या फोटोवरुन त्याने फिटनेसकडे अधिक लक्ष दिले असल्याचे दिसत आहे. राबता मध्ये सुशांत हा ‘दिलवाले’ या चित्रपटातील अभिनेत्री कृति सेनन सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तसेच रियल लाईफमध्येही दोघे जवळ येण्याची चर्चा आहे. परंतु, दोघांनेही या गोष्टीचा इन्कार केलेला आहे. राबता शिवाय सुशांतची ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपटही येत आहे. यामध्ये त्याने महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली असून, धोनीच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.