सुशांत सिंग राजपूतचा चंदा मामा दूर के चित्रपट होणार 26 जानेवारी 2018 ला प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2017 11:42 AM2017-01-26T11:42:38+5:302017-01-26T17:12:38+5:30

एम एस धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाच्या यशानंतर लोकांच्या सुशांतकडून असलेल्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. सुशांतने छोट्या पडद्यावरील ...

Sushant Singh Rajput's 'Chanda Mama' will be a distant film on January 26, 2018 | सुशांत सिंग राजपूतचा चंदा मामा दूर के चित्रपट होणार 26 जानेवारी 2018 ला प्रदर्शित

सुशांत सिंग राजपूतचा चंदा मामा दूर के चित्रपट होणार 26 जानेवारी 2018 ला प्रदर्शित

googlenewsNext
एस धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाच्या यशानंतर लोकांच्या सुशांतकडून असलेल्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. सुशांतने छोट्या पडद्यावरील पवित्र रिशता या मालिकेद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
गेल्या काही वर्षात त्याने बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसवले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो चंदा मामा दूर के या त्याच्या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात सुशांत एका अंतराळवीराची भूमिका साकारत आहे आणि त्यासाठी त्याने नुकतेच नासामध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले आहे. त्यानेच त्याच्या नासामधील प्रशिक्षणाचे फोटो पोस्ट केले आहेत. बोइंग 377 विमानाच्या कॉकपीटमध्ये बसलेला एक फोटोदेखील पोस्ट केला होता. 
या चित्रपटात खूप सारे व्हीएफएक्स इफेक्ट देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट 26 जानेवारी 2018 ला प्रदर्शित करण्याचे या चित्रपटाचे निर्माते संजय पुरण सिंग चौहान यांनी ठरवले आहे. ते सांगतात, या चित्रपटाच्या विषयामुळे हा चित्रपट 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीलाच प्रदर्शित होणे योग्य आहे. पुढचा 26 जानेवारी हा शुक्रवारी येत असल्याने चांगला वीकेंड मिळेल आणि त्यामुळेच आम्ही 26 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे.
सुशांत सिंग गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत आहे. अंकिता लोखंडे सोबत त्याचे अनेक वर्षांपासून अफेअर होते. पण गेल्या वर्षी त्या दोघांनी संगनमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे कीर्ती सॅनॉनसोबत अफेअर असल्याचे म्हटले जाते.

Web Title: Sushant Singh Rajput's 'Chanda Mama' will be a distant film on January 26, 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.