...तर 'या' महान क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये फटकेबाजी करताना दिसला असता सुशांत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:37 AM2020-09-04T09:37:28+5:302020-09-04T09:40:51+5:30

सुशांतचा बिझनेस पार्टनर वरूण माथुरला ईडीने लागोपाठ दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी त्याने सुशांतला कोणत्या प्रोजेक्टवर काम करण्याची इच्छा होती हे सांगितलंं.

Sushant Singh Rajput wanted to work on Sourav Ganguly biopic raveled actor business partner | ...तर 'या' महान क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये फटकेबाजी करताना दिसला असता सुशांत

...तर 'या' महान क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये फटकेबाजी करताना दिसला असता सुशांत

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये मनी लॉंड्रींगचा अ‍ॅंगल समोर आल्याने ईडी पुढील तपास करत आहे. केससंबंधी लोकांची चौकशी सुरू आहे. यात सुशांतचा बिझनेस पार्टनर वरूण माथुरला ईडीने लागोपाठ दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलवलं होतं.

भारतातील महान लोकांवर करायचे होते सिनेमे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरूण माथुरने आपल्या जबाबात सांगितले की, त्याची कंपनी Innsaei Ventures च्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतला भारतातील १२ महान व्यक्ती  स्वामी विवेकानंद, मदर टेरेसा, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी इत्यादींवर आधारित एक वर्चुअल रिअ‍ॅलिटी सिनेमावर काम करायचं होतं. हा त्याचा पहिला ठरला असता ज्यात तो १२ भूमिका साकारणार होता.

सौरव गांगुलीची भूमिका करायची होती

वीआर फिल्म सोबतच सुशांत सिंह राजपूतला भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा होती. या प्रोजेक्टबाब मीटिंगही झाली होती. पण पुढे त्यावर काही झालं नाही. सुशांतला या सिनेमात सौरव गांगुलीची भूमिका साकारायची होती.

वरूण माथुरच्या कंपनीत सुशांतची गुंतवणूक

वरूण माथुरची कंपनी Innsaei Ventures प्रायव्हेट लिमिटेडला एकूण ८ लाख रूपये खर्चून तयार करण्यात आलं होतं. सुशांत सिंह राजपूतने यात ५० हजार रूपये गुंतवणूक केली होती. यासोबतच त्याने ट्रॅव्हल आणि मीटिंगवर काही रूपये खर्च केले होते. वरूण माथुरने कंपनी बंद करण्यासाठी काही कागदपत्रे पाठवली होती. कारण सुशांत शूटींग आणि इतर गोष्टींमध्ये बिझी होता. हे कागदपत्रे सुशांतची वकिल प्रियांका खिमानीला पाठवले गेले होते. पण यात उशीर झाला आणि कंपनी बंद केली गेली.

वरूणने सलमानसोबतही केलं होतं काम

वरूण माथुर आधी सलमान खानसोबत युनायटेड बीईंग टॅलेंटेड एलएलपी नावाच्या फर्ममध्ये पार्टनर होता. सध्या तो एक कंपनी चालवतो जी निर्मात्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपला कंटेंट विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो.

हे पण वाचा:

सुशांत अचानक रडायचा, घाबरायचा...! उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले धक्कादायक खुलासे

सुशांतचा मृत्यू झाल्या दिवसापासून घरातील ही महत्त्वाची वस्तू अचानक झाली गायब, कुटुंबीयांचा CBI समोर खुलासा

अखेर सुशांतच्या 'डिप्रेशन'च्या रहस्यावरुन पडदा उठणार, CBI समोर मानसोपचारतज्ज्ञ हजर

Web Title: Sushant Singh Rajput wanted to work on Sourav Ganguly biopic raveled actor business partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.