सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर 6 दिवसांनी बहीण श्वेता सिंग किर्तीने घेतला हा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 12:37 IST2020-06-20T12:33:03+5:302020-06-20T12:37:05+5:30
सुशांतच्या निधनानंतर त्याची बहीण श्वेता सिंग किर्तीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर 6 दिवसांनी बहीण श्वेता सिंग किर्तीने घेतला हा मोठा निर्णय
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर येतायेत. कंगणा राणौतने तर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले गेला असा थेट आरोप केला आहे. सुशांत नेपोटिझमचा बळी ठरला. अनेक मोठ्या बॅनर्सनी सुशांतला बॅन केले होते अशी माहिती आता समोर येते आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. अनेक लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.
सुशांतच्या निधनानंतर त्याची बहीण श्वेता सिंग किर्तीने एक मोठा निर्णय घेतला आहे. श्वेताने आपले फेसबुक प्रोफाईल लॉक केले आहे. तिने आपल्या प्रोफाईल फोटोला देखील डिलीट केले आहे. गुरुवारपर्यंत श्वेताचा प्रोफाईल सगळ्यांना दिसत होते. आता मात्र श्वेताचे नाव सोडून एकही पोस्ट दिसत नाहीय. श्वेताने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. काही दिवसांपूर्वी श्वेताने ओपन लेटर सुशांतसाठी लिहिले होते आणि नंतर ते डिलीटदेखील केले होते.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूडच नव्हे तर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. बॉलिवूडच्या सलमान खान, करण जोहर, एकता कपूरसह काही जणांवर त्याला आत्महत्येला भाग पाडल्याचे आरोप करण्यात आले. या सगळ्या घडामोडींवर आता सुशांत सिंग राजपूत वाचू शकला असता, त्याची एक्स गर्लफ्रेंड त्याला वाचवू शकली असती, अशी भावनिक पोस्ट सुशांतच्या मित्राने केली आहे.