जर सुशांतने वाचवले नसते, तर Opps मोमेंटची शिकार झाली असती क्रिती सॅनन, पाहा video
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 16:20 IST2020-06-27T16:20:14+5:302020-06-27T16:20:45+5:30
दोघांनीही ‘राब्ता’ या सिनेमात एकत्र काम केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या होत्या. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने क्रिती शॉक्ड आहे.

जर सुशांतने वाचवले नसते, तर Opps मोमेंटची शिकार झाली असती क्रिती सॅनन, पाहा video
सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडला धक्का बसला होता. गेले अनेक दिवसांपासून त्याने आत्महत्या करण्यामागे कोणते कारण आहे यावर सध्या पोलिस तपास सुरू आहे. सुशांतची आत्महत्येवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान सुशांतच्या आठवणीत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) हीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्रितीने आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram) अकाऊंटवर सुशांत सोबतचे काही फोटो शेअर केले आहे. तसेच सुशांतसाठी एक भावूक मॅसेजही तिने लिहला होता.
दोघांनीही ‘राब्ता’ या सिनेमात एकत्र काम केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या होत्या. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने क्रिती शॉक्ड आहे. सुशांत अखेरचा निरोप देताना क्रिती हजर होती. सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना अश्रु अनावर होत आहे. त्याचे झाले असे की, सुशांत सिंग राजपूत आणि कृति सेनन यांच्या राब्ता या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये क्रितीने शॉर्ट घातला होता. या ड्रेसमुळे ती उप्स मोमेंटची शिकार होणार होती, परुंतु, सुशांतने समोर येत तिला वाचवले.
सुशांतने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.