सुशांत सिंग राजपूतला नव्हती कोणतीच आर्थिक समस्या, एका सिनेमासाठी घ्यायचा इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 15:49 IST2020-06-20T15:35:36+5:302020-06-20T15:49:22+5:30
सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली.

सुशांत सिंग राजपूतला नव्हती कोणतीच आर्थिक समस्या, एका सिनेमासाठी घ्यायचा इतके कोटी
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रोज नवे खुलासे होतायेत. मुंबई पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. सुशांतच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार सुशांतच्या मित्राने त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल बरेच काही सांगितले आहे. रिपोर्टनुसार त्याला कोणतीच आर्थिक चणचण नव्हती. त्याच्याकडे बरेच चित्रपट होते आणि नव्या प्रोजेक्टबाबत बोलणी सुरु होती. मित्राने असेही म्हटले की, पुढच्या वर्षी तो पूर्णपणे बिझी होता. जर सुशांतने आणखी दोन सिनेमा साईन केले असते तर 2022मध्ये त्याच्याकडे 5 प्रोजेक्ट झाले असते. सुशांत एक सिनेमासाठी 8 कोटी घ्यायचा.
सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले.
हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरला सुशांत सहा महिन्यांपूर्वी भेटला होता. ‘मी गेल्या वर्षभरापासून तणावात आहे. मला झोप येत नाही, मनात वाईट विचार येतात. अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप होण्यापूर्वी सर्व काही ठीक होते’, असे त्याने सांगितल्याचा जबाब डॉक्टरने पोलिसांना दिला आहे. त्यानंतर एका चित्रपटात सहकलाकार असलेली अभिनेत्री क्रिती सॅनन त्याच्या आयुष्यात आली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली. मात्र तिच्या आईला या दोघांच्या नात्याबद्दल समजले आणि तिने मुलीला सुशांतपासून वेगळे राहण्यास सांगितल्याने त्यांचे ब्रेकअप झाले.