VIDEO: अंकिता लोखंडेचा डान्स व्हिडीओ पाहून संतापले सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 03:17 PM2021-02-20T15:17:58+5:302021-02-20T15:26:15+5:30

Ankita lokhnade shares her dance video on Instagram : अंकिताचा हा व्हिडिओ पाहून सुशांतचे फॅन्स चांगलेच भडकले आहेत.

Sushant singh rajput fans angry after watching ankita lokhande's dance video | VIDEO: अंकिता लोखंडेचा डान्स व्हिडीओ पाहून संतापले सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स, म्हणाले...

VIDEO: अंकिता लोखंडेचा डान्स व्हिडीओ पाहून संतापले सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स, म्हणाले...

googlenewsNext

अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी शिमलाला गेली होती.  शिमला येथील अंकिताने सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. आता अंकिताने तिचा दुसरा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  अंकिताच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला पण सुशांत चाहते पुन्हा एकदा तिच्यावर संतापले आहेत.

अंकिता लोखंडे हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, 'जे लोक नेहमी डान्स करतात त्यांचा आत्म-समान मोठा असतो आणि आयुष्याकडे  सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात.'  

अंकिताच्या या व्हिडिओमुळे सुशांतचे चाहते नाराज आहेत. अनेक चाहत्यांनी अंकिताच्या या व्हिडिओवर टीका केली असून, तिला 'वेडी' देखील म्हटले आहे.   अंकिता चाहते मात्र तिचा हा व्हिडिओचा खूप एन्जॉय करतायेत. अलीकडेच अंकिताने तिचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यावर सुशांतच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून अंकिता सतत ट्रोल होतेय. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तर अंकिता ट्रोल होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी काळी अंकिता सुशांतच्या प्रेमात होती.

अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.
 

Web Title: Sushant singh rajput fans angry after watching ankita lokhande's dance video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.