सुशांत सिंग राजपूत नासाला जाऊन ट्रेनिंग घेणार ठरला पहिला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 11:08 IST2017-08-11T05:09:05+5:302017-08-15T11:08:00+5:30

'चंदा मामा दूर के' या चित्रपटासाठी अभिनेता सुशांत सिंग राजपूत नासाला जाऊन ट्रेनिंग घेऊन आला आहे, नासाला जाऊन ट्रेनिंग ...

Sushant Singh Rajput becomes the first actor to go to NASA for training | सुशांत सिंग राजपूत नासाला जाऊन ट्रेनिंग घेणार ठरला पहिला अभिनेता

सुशांत सिंग राजपूत नासाला जाऊन ट्रेनिंग घेणार ठरला पहिला अभिनेता

'
;चंदा मामा दूर के' या चित्रपटासाठी अभिनेता सुशांत सिंग राजपूत नासाला जाऊन ट्रेनिंग घेऊन आला आहे, नासाला जाऊन ट्रेनिंग घेणार तो पहिलाच भारतीय अभिनेता आहे. तो आता युएसएसआरमधून सुद्धा प्रशिक्षण घेतो आहे. आपल्या भूमिकेसाठी सुशांत सिंग राजपूत वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतो आहे. सुशांत सिंग राजपूत आपल्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी जबरदस्त मेहनत घेताना दिसतोय. युएसएसआरसीकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. ''यात सुशांतचे आणि दिग्दर्शकचे अभिनंदन केले आहे. सुशांतने घेतलेले प्रशिक्षण अनेक भारतीयांसाठी प्रेरणादायी असेल. आमच्याकडून या चित्रपटासाठी शुभेच्छा.''

निर्माता विकी राजानीचे म्हणणे आहे की ,''आमच्यासाठी ही एक सम्मानाची गोष्ट आहे की आम्ही बॉलिवूडमध्ये एक अशा प्रकारचा चित्रपट तयार करतो आहे. गेल्या 7-8 वर्षांपासून दिग्दर्शक संजय पुरन सिंग या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत. सुशांत सिंग याची ट्रेनिंग घेण्यासाठी नासाला जाऊन आला. आम्हाला आशा आहे की आमचा हा प्रयत्न यशस्वी होईल.''

ALSO READ :  भूमी पेडणेकर आणि सुशांतसिंग राजपूत बनणार डाकू

याचित्रपटात सुशांत सिंग एका अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर. माधवन हे ही याचित्रपटात झळकणार आहे. याचित्रपटातील अभिनेत्रीचा रोल अतिशय लहान आहे त्यामुळे अजून कोणतिही अभिनेत्रीचे नाव या रोलसाठी फायनल झालेले नाही. फातिमा सना शेख हिला चित्रपटाची ऑफर दिली गेली. निधी अग्रवाल हिलाही विचारणा आले होते.  पण त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुठलीही हिरोईन या रोलसाठी उत्सूक नाही असेच एकंदरीत दिसते आहे. 

Web Title: Sushant Singh Rajput becomes the first actor to go to NASA for training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.