सुशांतसिंह राजपूत व जॅकलिन फर्नांडिस का आलेत एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 13:35 IST2017-01-13T13:35:41+5:302017-01-13T13:35:41+5:30

अभिनेता सुशांतसिंह राजपूत सध्या जोरात आहे. ‘एमएस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटानंतर सुशांतचे भाव चांगलेच वाढते आहे. एखादा ...

Sushant Singh Rajput and Jacqueline Fernandes together? | सुशांतसिंह राजपूत व जॅकलिन फर्नांडिस का आलेत एकत्र?

सुशांतसिंह राजपूत व जॅकलिन फर्नांडिस का आलेत एकत्र?

िनेता सुशांतसिंह राजपूत सध्या जोरात आहे. ‘एमएस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटानंतर सुशांतचे भाव चांगलेच वाढते आहे. एखादा चित्रपट हिट झाला की बॉलिवूडमध्ये मागणी वाढते. तसेच काहीसे सुशांत सध्या अनुभवतो आहे. काल रात्री सुशांत सिंह राजपूत व श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हे दोघेही एकत्र दिसले. एका डान्स प्रॅक्टिससाठी हे दोघे बांद्राच्या स्टुडिओत आले होते. फोटोग्राफर्सनी या दोघांना एकत्र पाहिले, मग काय, सगळे कॅमेरे या दोघांकडे वळले. यावेळी जॅक गुलाबी रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये दिसली. नेहमीप्रमाणे जॅकलिन फोटोग्राफर्सला अगदी हसतमुखाने सामोरी गेली. सुशांतही हसत हसत स्टुडिओ बाहेर पडला. ग्रीन ट्रॅक पॅन्ट आणि मिलिटरी ग्रे स्वेटशर्टमधील सुशांतनेही फोटोग्राफर्सला विनातक्रार पोझ दिल्यात.


सुशांत व जॅकलिन लवकरच एकत्र काम करणार असल्याची सध्या जोरात चर्चा आहे. ‘दोस्ताना’सारखा सुपरहिट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक तरूण मनसुखानी यांच्या नव्या चित्रपटात हे दोघेही दिसणार असल्याचे कळते. या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरु होणार असल्याचीही चर्चा आहे. आता सुशांत व जॅकलिन काल रात्री एकत्र दिसले ते या चित्रपटाच्या निमित्ताने होते की, हे दोघे एखाद्या अवार्ड शोच्या डान्स परफॉर्मन्स प्रॅक्टिससाठी येथे आले होते, हे कळू शकले नाही. अर्थात ते लवकरच कळेल. कारण बॉलिवूडमध्ये फार काळ काहीही लपून राहत नाही, शेवटी हेच खरे.

सुशांतसिंह राजपूत व क्रिती सॅनॉन या दोघांचा ‘राबता’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होते आहे. आता जॅकलिन व सुशांतचा आॅनस्क्रीन रोमान्स रंगणार असेल तर त्यांच्या चाहत्यांना आनंद होणारच.

Web Title: Sushant Singh Rajput and Jacqueline Fernandes together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.