‘राबता’च्या सेटवर सुशांत जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 16:44 IST2016-08-23T11:14:49+5:302016-08-23T16:44:49+5:30
‘राबता’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत जखमी झाला आहे. एक अॅक्शन सीन करताना सुशांतच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला ...

‘राबता’च्या सेटवर सुशांत जखमी
‘ ाबता’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत जखमी झाला आहे. एक अॅक्शन सीन करताना सुशांतच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याला महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय धावण्यास मनाई केली आहे. सुशांतने आज या अपघाताबद्दल माहिती दिली. आम्ही बराच सराव केला होता. त्यामुळेच आमचा प्रत्येक स्टंट परफेक्ट होता. मात्र दुर्दैवाने जमीन निसरडी असल्यामुळे हा अपघात झाला. पण समधान याचेच की,तोपर्यंत आम्ही आमचा शॉट परफेक्ट टिपला होता, असे सुशांतने स्पष्ट केले. सो गेट वेल सून सुशांत!!