संदीप सिंहच्या दाव्याची पोलखोल, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा खास मित्र असल्याचं केला होता दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:20 PM2020-08-25T15:20:28+5:302020-08-25T15:27:45+5:30

हॉस्पिटलपासून ते स्मशानभूमीपर्यंत संदीप सिंह सर्वात पुढे समोर दिसला होता. कूपर हॉस्पिटलमध्येही संदीप सिंह सगळं काम करताना दिसला होता. त्याच्या देखरेखीखाली तिथे काम झालं होतं. सुशांतच्या बहिणीसोबतही संदीप दिसला होता.

Sushant Friend Sandip Singh call records reveals no call made between him and actor in one year | संदीप सिंहच्या दाव्याची पोलखोल, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा खास मित्र असल्याचं केला होता दावा!

संदीप सिंहच्या दाव्याची पोलखोल, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा खास मित्र असल्याचं केला होता दावा!

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत. सीबीआय त्यांचा तपास करत आहेच, पण सोबतच सुशांतशी संबंधित लोक वेगवेगळे दावे करत आहेत. आता सुशांतचा जवळचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या फिल्ममेकर संदीप सिंहबाबत एक नवीन माहिती समोर  आली आहे. त्याच्या कॉल डिटेल्समधून खुलासा झालाय की गेल्या १ वर्षात संदीप सिंह आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यात काहीच बोलणं झालं नव्हतं. याच संदीप सिंहवर सुशांतच्या परिवारातील लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

कॉल डिटेल्सनुसार, संदीप सिंहने गेल्या १ वर्षात सुशांतला एकदाही फोन केला नाही. तरी सुद्धा तो स्वत:ला सुशांतचा जवळचा मित्र सांगतो. सुशांतच्या परिवाराने आधीच हा दावा केला आहे की, ते संदीप सिंहला ओळखत नाहीत. त्यांना हेही माहीत नाही की, संदीप सुशांतचा जवळचा होता. 

अशात सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंह हा सर्वात पुढे काम करताना दिसला. हॉस्पिटलपासून ते स्मशानभूमीपर्यंत संदीप सिंह सर्वात पुढे समोर दिसला होता. कूपर हॉस्पिटलमध्येही संदीप सिंह सगळं काम करताना दिसला होता. त्याच्या देखरेखीखाली तिथे काम झालं होतं. सुशांतच्या बहिणीसोबतही संदीप दिसला होता.

पण आाता ज्याप्रकारे संदीप सिंहबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत की, संदीप सिंहला कुणी हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं का? कारण सुशांतसोबत त्याचं गेल्या १ वर्षांपासून काहीच बोलणं झालं नव्हतं. पण मग का त्याने पुढे येऊन लीड करत होता. तसेच संदीप सिंहचं दुबई कनेक्शनही असल्याचं बोललं जात आहे.

आजतक सोबत बोलताना संदीप सिंह म्हणाला की, 'जेव्हा सुशांतच्या मृत्यूची माहिती मिळाली तर धक्का बसला होता. १० मिनिटे काहीच समजलं नाही. नीतू दीदी आणि बाकी लोक काहीच बोलू शकत नव्हते. घरी केवळ एक मॅनेजर आणि तीन किंवा चार नोकर होते. सगळे धक्क्यात होते. पोलीस आपली फॉर्मॅलिटी करत होते. घरातील लोकांना विश्वात बसत नव्हता की, त्यांच्या गुलशनने काय केलं'.

हे पण वाचा 

'ही आत्महत्या नाही हत्या', सुशांतच्या अ‍ॅक्टिंग कोचचा खळबळजनक आरोप

सुशांतचे घर सोडताना 8 जूनला सिद्धार्थ पिठानीला हा खास निरोप देऊन निघाली होती रिया चक्रवर्ती

सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड? काय म्हणाले एम्सचे फॉरेन्सिक प्रमुख?

 

Web Title: Sushant Friend Sandip Singh call records reveals no call made between him and actor in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.