Suriya : दिलदार सुपरस्टार! फॅनच्या मृत्यूनंतर मुलीच्या शिक्षणाचा उचलला खर्च; परिवारालाही मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:41 PM2022-05-31T12:41:58+5:302022-05-31T12:42:09+5:30

Suriya Helps Fan Family: काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्याचा डाय हार्ड फॅन जगदीशचं एका रोड अपघातात निधन झालं होतं. जगदीश सूर्याच्या एका फॅन क्लबचा सेक्रेटरी होता.

Suriya visits fan house after his death promised to get a job for wife | Suriya : दिलदार सुपरस्टार! फॅनच्या मृत्यूनंतर मुलीच्या शिक्षणाचा उचलला खर्च; परिवारालाही मदत

Suriya : दिलदार सुपरस्टार! फॅनच्या मृत्यूनंतर मुलीच्या शिक्षणाचा उचलला खर्च; परिवारालाही मदत

googlenewsNext

Suriya Helps Fan Family: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार सूर्याची देशभरात मोठी फॅन फॉलोईंग आहे. तो नेहमीच त्याच्या फॅन्ससोबत कनेक्ट राहतो. नुकतंच जेव्हा सूर्याला समजलं की, त्याच्या एका मोठ्या फॅनचा मृत्यू झाला. तेव्हा तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याच्या घरी पोहोचला. इतकंच नाही तर सूर्याने आता आपल्या फॅनच्या परिवाराची पूर्णपणे मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्याचा डाय हार्ड फॅन जगदीशचं एका रोड अपघातात निधन झालं होतं. जगदीश सूर्याच्या एका फॅन क्लबचा सेक्रेटरी होता. जेव्हा सूर्याला हे समजलं तेव्हा तो जगदीशच्या परिवाराला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. सूर्याने परिवाराला आर्थिक मदत करण्याचा आश्वासन दिलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, सूर्याने जगदीशच्या पत्नीला नोकरी मिळवून देणार असं सांगितलं आणि असंही म्हणाला की, त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्चही तो करेल. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यात सूर्या आपला फॅन जगदीशच्या फोटोला फूलं वाहताना दिसत आहे. त्याला श्रद्धांजली देत आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर गेल्यावेळी सूर्या अॅक्शन-ड्रामा Etharkkum Thunindhavan मध्ये दिसला होता. ज्यातील त्याच्या कामाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. सध्या तो फिल्ममेकर बालासोबत एका नव्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या टायटलची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या रिलीज झालेला सूर्याचा 'जयभीम' सिनेमा खूपच गाजला. यात त्याने एका वकिलाची भूमिका साकारली होती. 
 

Web Title: Suriya visits fan house after his death promised to get a job for wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.